new IT rules : आयटीच्या नव्या नियमांवरून अद्याप केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये वाद कायम आहे. तथापि, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या नियमांनुसार काम सुरू झाले आहे. भारतीय प्लॅटफॉर्म कू, गुगलने आपला पहिला अनुपालन अहवाल सरकारला सादर केला आहे. लवकरच फेसबुकदेखील आपला अहवाल सरकारला देणार असल्याची माहिती समोर आली आहे. new IT rules Koo and Google submitted their report To Central Government
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आयटीच्या नव्या नियमांवरून अद्याप केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये वाद कायम आहे. तथापि, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या नियमांनुसार काम सुरू झाले आहे. भारतीय प्लॅटफॉर्म कू, गुगलने आपला पहिला अनुपालन अहवाल सरकारला सादर केला आहे. लवकरच फेसबुकदेखील आपला अहवाल सरकारला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
26 मेपासून अस्तित्वात आलेल्या नवीन आयटी नियमांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दरमहा एक अहवाल द्यावा लागेल, ज्यामध्ये त्यांना किती तक्रारी आल्या आणि त्याबद्दल त्यांनी कोणती कारवाई केली हे सांगावे लागेल. ही तक्रार सामग्री, आक्षेपार्ह पोस्ट, कॉपीराइट किंवा इतर कशाबद्दलही असू शकते.
आयटीच्या नवीन नियमांनुसार Koo ने जून महिन्याचा अनुपालन अहवाल सादर केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला आपला अहवाल सादर करतील, जो सार्वजनिक व्यासपीठावर उपलब्ध होईल. अहवालानुसार, जूनमध्ये एकूण 5502 तक्रारी Kooला प्राप्त झाल्या. यात त्यांनी 1253 पोस्ट हटवल्या आणि इतर पोस्टवर कारवाई केली.
याशिवाय सुमारे 54,255 खात्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी सुमारे २ हजार खाती काढून उर्वरितांवर कारवाई करण्यात आली. यात इशारा देणे, फोटो ब्लर करणे आणि इतर उपायांचा समावेश आहे.
kooचे संस्थापक ए. राधाकृष्ण म्हणतात की, Koo जसजसे मोठे होत आहे तसतसे आम्ही कायद्याचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. हा अहवाल त्या दिशेने एक पाऊल आहे. आमचा प्रयत्न सोशल मीडियाला एक सुरक्षित ठिकाण बनवण्याचा आहे.
सर्च इंजिन गुगलनेही एप्रिलसाठी आपला अनुपालन अहवाल दिला आहे. गुगलकडे सुमारे 96 टक्के तक्रारी कॉपीराइटविषयी आल्या आहेत. 1 ते 30 एप्रिलदरम्यान गुगलला 27 हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. गुगलव्यतिरिक्त फेसबुकही आपला अहवाल सादर करेल. अंतरिम अहवाल 2 जुलै रोजी फेसबुक आणि 15 जुलै रोजी संपूर्ण अहवाल सादर केला जाईल. फेसबुक अहवालात व्हॉट्सअॅपशी संबंधित डेटाही असेल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, बहुतांश सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारत सरकारचे नवीन आयटी नियम स्वीकारले गेले आहेत, तरीही ट्विटरद्वारे याबाबत आक्षेप घेण्यात येत आहे. यामुळे ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात अनेक आघाड्यांवरून संघर्ष सुरू आहे.
new IT rules Koo and Google submitted their report To Central Government
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App