विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नीट-यूजी पेपल लीक प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी एनटीएला (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) उमेदवारांची ओळख लपवून शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. एनटीएने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हे निकाल प्रसिद्ध करावेत असं सरन्यायाधीशांनी सांगितले. NEET-UG Paper Leak Case
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्दीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय पात्रता सहपरीक्षा-पदवी २०२४ (नीट-यूजी २०२४) शी संबंधित सर्व याचिकांवर आज महत्त्वाचा निकाल दिला.
प्रत्येक परीक्षा केंद्राचा स्वतंत्र निकाल जाहीर करावा, असे आदेश देत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (२२ जुलै) होईल असंही सांगितलं. ते म्हणाले, सोमवारी बिहार पोलीस आणि ईओडब्ल्यूचे अहवालही सादर केले जावेत”. या सुनावणीवेळी एनटीएने न्यायालयाला सांगितलं की २४ जुलैपासून नीट-यूजीचं काऊन्सलिंग सुरू होईल.
दरम्यान, या सुनावणीवेळी महाधिवक्ते तुषार मेहता यांनी न्यायालयाला विनंती केली की परीक्षा केंद्र जाहीर करू नयेत. मात्र न्यायमूर्ती म्हणाले, केंद्रनिहाय निकाल जाहीर केल्यामुळे आकडेवारीचं स्वरूप स्पष्ट होईल. दरम्यान, चंद्रचूड म्हणाले, पाटणा आणि हजारीबागमध्ये पेपर फुटले होते ही वस्तुस्थिती आहे. कारण अनेकांकडे परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका उपलब्ध होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App