Neeraj Chopra Wins Gold : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक अंतिम स्पर्धेत इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. यासह भारताच्या एकूण पदकांची संख्या 7 झाली आहे. बारा वर्षांनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. Neeraj Chopra Wins Gold in javelin throw in Tokyo Olympics 2020, After 12 years India Wins Gold
वृत्तसंस्था
टोकियो : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक अंतिम स्पर्धेत इतिहास रचत सुवर्णपदकाला (Neeraj Chopra Wins Gold) गवसणी घातली आहे. यासह भारताच्या एकूण पदकांची संख्या 7 झाली आहे. बारा वर्षांनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. एकूण 87.58 मीटर्स लांब भाला फेकून नीरजने सुवर्णपदकावर नाव कोरले. तब्बल 12 वर्षांनी भारताच्या वाट्याला वैयक्तिक कामगिरीमध्ये सुवर्णपदक आले आहे. यापूर्वी अभिनव बिंद्राने शूटिंगमध्ये भारतासाठी गोल्ड जिंकले होते.
पहिल्या तीन राऊंडपासूनच भारताचा नीरज चोप्रा 87.58 मीटरच्या थ्रोसह पहिल्या स्थानावर कायम राहिला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात हा थ्रो केला होता. नीरजचा चौथा थ्रो फाउल गेला. परंतु यानंतरही नीरजच्या थ्रोची बरोबरी कुणालाही करता आली नाही.
तत्पूर्वी, नीरज चोप्राने (Neeraj Chopra Wins Gold) पात्रता फेरीतही इतिहास रचला होता. त्याने पहिल्या प्रयत्नात 86.65 मीटर थ्रोसह फायलनसाठी पात्रता मिळवली. आज (7 ऑगस्ट) या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यात आला. सर्वांच्या नजरा नीरज चोप्रावर होत्या. नीरजने पात्रता फेरीत ज्याप्रकारे कामगिरी केली, तीच कामगिरी करून भारताला सुवर्णपदक मिळवून देईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. भालाफेकमध्ये नीरज आधीच पदकाचा विजेता मानला जात होता.
अंतिम सामन्यात आठ खेळाडू पदकासाठी नशीब आजमावत होते. नीरजने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जगभरात यश मिळवले आहे. तर त्याच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया.
नीरजने पात्रता फेरीत 2017 चा विश्वविजेता जोहान्स व्हेटरचा पराभव करून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. जोहान्स तोच खोळाडू आहे ज्याने सांगितले की कोणालाही त्याला पराभूत करणे सोपे असणार नाही. पण नीरजने त्याचा पराभव केला. नीरजने अंतिम फेरी गाठणे ही मोठी कामगिरी आहे. कारण ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतातील कोणत्याही खेळाडूने आतापर्यंत ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत पदक जिंकले नाही. भाला फेकणारा नीरज चोप्राने हा दुष्काळ संपवला.
नीरज चोप्रा हा हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खंड्रा गावाचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्याने चंदिगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्याच वर्षी 2016 मध्ये पोलंडमध्ये आयोजित IAAF चॅम्पियनशिपमध्ये त्याने 86.48 मीटर फेकून सुवर्णपदक जिंकले. त्याच्या कामगिरीनंतर त्याला सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. यानंतर त्याने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, मी शेतकरी कुटुंबातील आहे.
2018 मध्ये इंडोनेशियाच्या जकार्ता येथे आशियाई खेळ आयोजित करण्यात आले होते. या एशियाडमध्ये नीरज चोप्राने भालाफेकमध्ये 88.06 मीटर अंतरासह सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. एशियाडमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताने आतापर्यंत फक्त दोन पदके जिंकली आहेत. नीरजच्या आधी गुरतेज सिंगने 1982 साली कांस्यपदक जिंकले होते. 2018 मध्ये आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा नीरज दुखापतीचा बळी ठरला. यानंतर, कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमुळे अनेक भालाफेक कार्यक्रम आयोजित करता आले नाहीत. मार्च 2021 मध्ये इंडियन ग्रांप्रीमध्ये नीरजने 88.07 मीटर फेकून स्वतःचा विक्रम मोडला. भालाफेकमध्ये नीरजची आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
23 वर्षीय नीरज अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा अॅथलीट अंजू बॉबी जॉर्ज नंतर दुसरा भारतीय आहे. त्याने 2016 मध्ये IAAF वर्ल्ड अंडर 20 मध्ये सुवर्णपदक जिंकले. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 82.23 मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला. यानंतर 2017 मध्ये नीरजने 85.23 मीटर थ्रोसह आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
आशियाई खेळ 2018 जकार्ता सुवर्ण पदक, राष्ट्रकुल खेळ 2018 गोल्ड कोस्ट सुवर्ण पदक, आशियाई चॅम्पियनशिप 2017 भुवनेश्वर सुवर्ण पदक, दक्षिण आशियाई खेळ गुवाहाटी 2016 सुवर्ण पदक, जागतिक कनिष्ठ चॅम्पियनशिप 2016 सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ चॅम्पियनशिप 2016 रौप्य पदक.
Neeraj Chopra Wins Gold in javelin throw in Tokyo Olympics 2020, After 12 years India Wins Gold
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App