पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.NCB witness Kiran Gosavi absconded; Gosavi’s female assistant arrested
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यासाठी एनसीबीने किरण गोसावी यांना साक्षीदार बनवल होत.दरम्यान किरण गोसावी आता फरार झाला आहे. पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला फरासखाना पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात आलंय.
शेरबानो कुरेशी असे या महिला असिस्टंटचे नाव आहे. किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं कार्यरत आहेत. या पथकांनी केलेल्या कारवाईत शेरबानो कुरेशीला ताब्यात घेण्यात आले आहे. आज शेरबानो कुरेशीला कोर्टात हजर केले जाणार आहे. तर एक पथक किरण गोसावीच्या शोधत आहे.
कोण आहे किरण गोसावी?
कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के.पी.जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App