एनसीबीचा पंचनामा : आर्यन खानचा ड्रग सेवनाचा कबुलीनामा, अरबाजने स्वतःच शूजमधून बाहेर काढले होते पाकीट


एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे की, त्याने चरसचे सेवन केले आहे. त्याचा मित्र अरबाज मर्चंट त्याच्या शूजमध्ये 6 ग्रॅम चरस लपवून लक्झरी क्रूझवर गेला होता, जेणेकरून त्यांना क्रूझवर धमाकेदार पार्टी करता येईल. aryan khan arbaaz merchant mumbai drug case ncb punchnama detail raid


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे की, त्याने चरसचे सेवन केले आहे. त्याचा मित्र अरबाज मर्चंट त्याच्या शूजमध्ये 6 ग्रॅम चरस लपवून लक्झरी क्रूझवर गेला होता, जेणेकरून त्यांना क्रूझवर धमाकेदार पार्टी करता येईल.

2 ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या समुद्रात एनसीबीने छापा टाकलेल्या लक्झरी क्रूजशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. क्रूझमधील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा अरबाज खानला विचारले की, त्याच्याकडे काही ड्रग्ज आहेत का, तेव्हा त्याने सांगितले की त्याने त्याच्या शूजमध्ये ड्रग्स लपवलेले आहेत. एनसीबीने विचारणा केली असता अरबाज मर्चंटने स्वतः त्याच्या शूजमधून चरस असलेले झिप लॉक पाउच काढले.

अरबाजने कबूल केले की तो आर्यन खानसोबत चरस घेतो आणि ते क्रूझवर पार्टी करण्याच्या तयारीत होते. जेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानला विचारले, तेव्हा त्याने कबूल केले की त्याने चरसचे सेवन केले आणि हे चरस क्रूझ ट्रिपमध्ये धूम्रपान करण्यासाठी घेतले जात होते. लक्झरी क्रूझ कॉर्डेलियावरील छाप्याचे हे तपशील एनसीबीच्या पंचनामावर आधारित आहेत.एनसीबीच्या पंचनाम्यात दोन पंचांचा उल्लेख आहे. किरण गोसावी आणि प्रभाकर रोघोजी सेन. या पंचनामाच्या पान क्रमांक 6 मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटचा उल्लेख आहे. पंचनाम्यानुसार, आर्यन खान आणि अरबाज मर्चंटने पहिल्यांदा एनसीबी अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांनी विचारल्यावर त्यांची नावे दिली. मग एनसीबीच्या अधिकाऱ्यानेही त्यांना चौकशीचे कारण सांगितले.

यानंतर आशिष रंजन प्रसाद यांनी दोन्ही तरुणांना एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 50 मधील तरतुदी समजावून सांगितल्या. एनसीबीने आर्यन आणि अरबाजला पर्यायदेखील दिला की जर त्यांना त्यांची चौकशी राजपत्रित अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यांसमोर करायची असेल तर ते होऊ शकते, परंतु दोघांनीही विनंती नाकारली.

यानंतर चौकशी प्रक्रिया सुरू झाली. पंचनाम्यानुसार, तपास अधिकाऱ्याने दोघांना विचारले की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ आहेत का. या प्रश्नाला उत्तर देताना दोघांनी त्यांच्यासोबत बंदी घातलेल्या ड्रग्ज असल्याचे स्वीकारले.

एनसीबीच्या पंचनाम्यात म्हटले आहे की, अरबाज मर्चंटने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की त्याच्या शूजमध्ये चरस आहे. यानंतर अरबाजने स्वेच्छेने त्याच्या शूजमध्ये ठेवलेले झिप लॉक पाउच काढले. या झिप लॉकच्या आत एक काळा चिकट पदार्थ होता. जेव्हा डीडी किटसह त्याची चाचणी घेण्यात आली, तेव्हा हे पदार्थ चरस असल्याचे निश्चित झाले. पंचनाम्यानुसार, अरबाजने कबूल केले की तो आर्यन शाहरुख खानसोबत चरस घेतो आणि ते या क्रूझ ट्रिपमध्ये पार्टी करणार होते. पंचनाम्यात लिहिले आहे की यानंतर जेव्हा आर्यन खानला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने कबूल केले की तो चरसदेखील घेतो आणि हे चरस क्रूझवर प्रवास करताना धूम्रपान करण्यासाठी होते. या चरसचे वजन 6 ग्रॅम होते.

aryan khan arbaaz merchant mumbai drug case ncb punchnama detail raid

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती