नॅशनल हेराल्ड प्रकरण : सर्व नेत्यांनी घेतले व्होरांचे नाव, सर्व आर्थिक निर्णय मोतीलाल व्होराच घ्यायचे, पण पुरावा नाही


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आर्थिक व्यवहारांची माहिती नसल्याचे सांगितले. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि पवन बन्सल यांनी सांगितले की, व्यवहाराशी संबंधित प्रत्येक निर्णय मोतीलाल व्होरा घेत होते. मात्र, याचा पुरावा ते देऊ शकले नाहीत.National Herald case All leaders took Vora’s name, Motilal Vora was supposed to take all financial decisions, but no proof

ईडीला तपासात अनेक बनावट कंपन्या सापडल्या

काँग्रेस नेते मल्लार्जुन खर्गे हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​एकमेव कर्मचारी आहेत. अशा स्थितीत ईडीकडे खर्गे यांना चौकशीसाठी बोलावण्याशिवाय पर्याय नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीला अनेक बनावट कंपन्या सापडल्या. ज्यांच्याशी यंग इंडियाचा व्यवहार झाला. कंपनीच्या 90 कोटींच्या व्यवहारांवर ईडीचा संशय आहे.



ईडीने खरगे यांची 8 तास केली चौकशी

नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची आठ तास चौकशी केली. तपास यंत्रणेने यंग इंडियाच्या कार्यालयातच त्यांची चौकशी केली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौकशी सुरू झाली. यावेळी कार्यालयाचीही झडती घेण्यात आली.

रात्री साडेआठच्या सुमारास खरगे तब्बल आठ तासांनंतर कार्यालयातून बाहेर आले. इडीच्या समन्सवर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे यांनी गुरुवारीच प्रश्न उपस्थित केला होता. संसदेच्या कामकाजादरम्यान बोलावणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला होता. यावर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी उत्तर दिले की, कोणी चुकीचे केले तर एजन्सी कारवाई करतील. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.

यंग इंडियाचे कार्यालय सील

यापूर्वी बुधवारीही येथे शोध घेण्यात आला आहे. छापेमारीनंतर ईडीने नॅशनल हेराल्ड इमारतीतील यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कार्यालय सील केले होते. यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल करत देशातील लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला.

कोण होते मोतीलाल व्होरा?

मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. ते दोन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 2000 ते 2018 (18 वर्षे) ते पक्षाचे कोषाध्यक्षही होते. 21 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे निधन झाले. 1970 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 1972 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. यानंतर 1977 आणि 1980 मध्येही आमदार निवडून आले. अर्जुन सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते उच्च शिक्षण खात्याचे राज्यमंत्री होते. 1983 मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. 1981-84 दरम्यान ते मध्य प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्षही होते.

13 फेब्रुवारी 1985 रोजी व्होरा यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्यात आले. 13 फेब्रुवारी 1988 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन 14 फेब्रुवारी 1988 रोजी केंद्राच्या आरोग्य-कुटुंब कल्याण आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. एप्रिल 1988 मध्ये व्होरा मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले. 26 मे 1993 ते 3 मे 1996 पर्यंत ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड प्रकरण पहिल्यांदा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये उघडकीस आणले होते. ऑगस्ट 2014 मध्ये ईडीने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडीस, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांना आरोपी करण्यात आले होते.

National Herald case All leaders took Vora’s name, Motilal Vora was supposed to take all financial decisions, but no proof

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात