फारुख अब्दुल्ला यांची जम्मू-काश्मीरमध्ये घोषणा
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला ( Farooq Abdullah ) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची आघाडी काँग्रेससोबत असेल, अशी घोषणा केली आहे. दोन्ही पक्ष युती करून निवडणूक लढवणार आहेत. ते म्हणाले की, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स युतीने विधानसभा निवडणूक लढवतील.
यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेससोबत युती करण्याचे संकेत दिले होते. राहुल गांधी यांनी काँग्रेस फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स पक्षासोबत युती करण्याबाबत बोलले होते. गुरुवारी श्रीनगरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, युती होईल, पण काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचा सन्मान राखला जाईल.
जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. राहुल गांधी म्हणाले की, त्यांना जम्मू-काश्मीरमधील लोक केवळ आवडतच नाहीत, तर त्यांच्यावर प्रेमही आहे.
राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीबाबत फारुख अब्दुल्ला म्हणाले की, आमची भेट खूप चांगली झाली. आम्ही सर्व 90 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. आम्ही एक आहोत, सीपीआयएमसह इंडिया आघाडीचे पक्ष एकत्र आहेत. ते पीडीपीवर म्हणाले की, कोणासाठीही दरवाजा बंद नाही. काँग्रेस प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात झाली याचा मला खूप आनंद आहे. काँग्रेस, सीपीआयएम आणि काँग्रेस एकत्र आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App