भारत अमेरिकेबरोबर Game खेळत असताना पाकिस्तानी सरकार मात्र “थंड”; the dawn च्या अग्रलेखातून वाभाडे!!

Donald Trump

नाशिक : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेला भेट देऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच त्यांच्या प्रशासनाशी आणि अमेरिकन उद्योगपतींशी चर्चा केली. मोदींच्या या अमेरिका दौऱ्यात भारत अमेरिका व्यापारात येत्या पाच वर्षांमध्ये तब्बल 500 अब्ज डॉलर्स पर्यंत झेप घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. Narendra Modi visited the United States and met with Donald Trump.

यामध्ये संरक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑइल, नॅचरल गॅस, एनर्जी या विविध क्षेत्रांमध्ये भारत – अमेरिका सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला F35 लढाऊ विमाने विकण्याची तयारी दाखवली. मोदींच्या या अमेरिका दौऱ्याच्या “साईजवर” पाकिस्तान धास्तावला. भारत आणि अमेरिका या दोन बलाढ्य लोकशाही देशांमध्ये सुसंवाद वाढला व्यापार करार झाले संरक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य वाढले तर पाकिस्तानची अवस्था किती केविलवाणी होईल याचे वर्णन पाकिस्तानातील आघाडीचे वृत्तपत्र the dawn ने आपल्या अग्रलेखात केले.

मोदींनी आपल्या सरकारच्या कारकिर्दीत भारताची अर्थव्यवस्था जगातल्या पाचव्या क्रमांकावर नेऊन ठेवली. याचे आकर्षण अमेरिकेला निर्माण झाले. भारतात अमेरिकेला फार मोठ्या “संधी” दिसल्या म्हणूनच ट्रम्प प्रशासनाने मोदींचे भव्य स्वागत केले. हे भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे निदर्शक ठरले.

वास्तविक अमेरिका आणि पाकिस्तान यांचे सहा दशकांचे संबंध दृढमूल होते आणि आहेत. पण पाकिस्तान अमेरिकेवर over dependant राहिला. जागतिक पातळीवरचे फेरबदल पाकिस्तानी सरकारांना टिपता आले नाहीत. त्यानुसार धोरणांमध्ये बदल करून पाकिस्तानला जगाचा वेग साधता आला नाही पाकिस्तान काळाच्या ओघात फारच मागे पडला. याचा फटका अमेरिका – पाकिस्तान संबंधांना बसला.

त्यामुळे आज भारत अमेरिकेबरोबर Game खेळत असताना पाकिस्तानी राज्यकर्ते मात्र “थंड” बसलेत. तिकडे ट्रम्प प्रशासनाने भारतीय वंशाच्या एस पाल कपूर यांना आपल्या प्रशासनाचे साउथ एशियन इन्व्हॉय नेमले. हे कपूर आपल्या पाकिस्तान विरोधी धोरणासाठी प्रसिद्ध आहेत. येत्या चार वर्षांमध्ये ते अमेरिकेत पाकिस्तान विरुद्ध मोठी वातावरण निर्मिती करू शकतात याकडे खरं म्हणजे पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. पण पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आता “आवाजच” उरलेला नाही. भारत आणि अमेरिका संबंध कितीतरी पुढे निघून गेलेत. पाकिस्तानी राज्यकर्ते भ्रष्टाचार, घराणेशाही‌ यांच्या चिखलात अडकून खूप मागे पडलेत.

पाकिस्तानला स्वतःचे स्वतंत्र आणि सार्वभौम असे संरक्षण तसेच परराष्ट्र धोरणच उरलेले नाही. ज्याची नव्या जागतिक व्यवस्थेत भरपूर गरज आहे. तिथेच पाकिस्तानी राज्यकर्ते आणि राज्य व्यवस्था खूप कमी पडलेत.

अशा परखड शब्दांमध्ये the dawn ने पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे आणि राज्यव्यवस्थेचे वाभाडे काढले. या सगळ्यांमध्ये गेल्या सहा दशकांमध्ये पाकिस्तानने जागतिक दहशतवादाचा भस्मासूर पोसला आणि फक्त भारतद्वेष वाढविला. यावर मात्र the dawn ने अग्रलेखातून कुठला “प्रकाश” टाकला नाही.

Narendra Modi visited the United States and met with Donald Trump.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात