विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हाय पीचवर गेलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आज (5 फेब्रुवारी) मतदान होणार आहे, त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज मध्ये कुंभमेळ्यात सहभागी होऊन त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहेत. Narendra Modi
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 जागांसाठी आज मतदान होणार आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी – भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत होत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री काल या तिन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन गुंडगिरी आणि मतदानात गैरप्रकार या विषयांवरून तक्रारी दाखल केल्या. दिल्ली पोलिसांनी संवेदनशील 17 मतदारसंघांमध्ये फ्लॅग मार्च काढला.
दिल्लीतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराज मध्ये कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहेत. सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० असे ते सुमारे अडीच तास प्रयागराज मध्ये असतील त्रिवेणी संगमावर स्नान करून पंतप्रधान मोदी ताबडतोब दिल्लीमध्येच परतणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्या दरम्यान प्रयागराज मध्ये प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App