
नागरिकांना अधिक फायदे मिळावेत यासाठी दोन्ही देशांनी सामाजिक सुरक्षा करारावरही सहमती दर्शविली आहे.Narendra Modi
विशेष प्रतिनिधी
वॉर्सा : पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आणि पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज सेबॅस्टियन डुडा यांनी गुरुवारी येथील बेलवेडेरे पॅलेसमध्ये द्विपक्षीय बैठकीत अन्न प्रक्रिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऊर्जा आणि पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात भारत-पोलंड भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा केली.
त्यांनी भारत-पोलंड संबंधांचे धोरणात्मक भागीदारीमध्ये सुधारणा करण्याचे स्वागत केले, असे परराष्ट्र मंत्रालयाने बैठकीनंतर सांगितले. त्यांनी युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्षांसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. ऑपरेशन गंगा दरम्यान युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पोलंडने दिलेल्या अमूल्य आणि वेळेवर मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
मंत्रालयाने सांगितले की, नागरिकांना अधिक फायदे मिळावेत यासाठी दोन्ही देशांनी सामाजिक सुरक्षा करारावरही सहमती दर्शविली आहे. पोलंडसोबतच्या स्नेहपूर्ण संबंधांना भारत खूप महत्त्व देतो, असे पंतप्रधान मोदींनी Narendra Modi भेटीनंतर ट्विटरवर पोस्ट केले. आगामी काळात दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. असं ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष डुडा यांच्या कार्यालयाने सांगितले की, दोन्ही नेत्यांमधील चर्चेतील प्रमुख विषय म्हणजे युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि त्याचे जागतिक परिणाम हा होता.
Narendra Modi discussed conflicts in Ukraine West Asia with President of Poland
महत्वाच्या बातम्या
- Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट, 15 ठार, 40 जखमी
- Lakda shetkari Yojana : लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ महाराष्ट्रात लाडका शेतकरी योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा!!
- Madhya Pradesh : ‘या’ राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये झाला बदल!
- Champai Soren : चंपाई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची केली घोषणा!