राजीव गांधी फाउंडेशन, चॅरिटेबल ट्रस्टमध्ये किती ओबीसी + बीसी??; राहुल गांधींनी जातीचा मुद्दा उकरल्यावर नड्डा + सीतारामन यांचे सवाल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पातल्या काही प्रथा परंपरा यांचा उल्लेख राहुल गांधी यांनी जातीच्या आधारावर केला, त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर लोकसभेत स्वतःच्या डोक्याला हात लावून घेतला. पण आज मात्र राज्यसभेचे नेते जे. पी. नड्डा आणि निर्मला सीतारामन यांनी राज्यसभा आणि लोकसभेत काही तिखट सवाल करून काँग्रेसचे वाभाडे काढले. Nadda and Sitharaman question Rahul Gandhi’s remarks on caste issue.

हे घडले असे :

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्पावर काल विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधींनी या चर्चेची सुरुवात केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी यांची तुलना महाभारतातल्या कौरवांशी केली. राहुल गांधींनी चक्रव्यूहाची गोष्ट सांगितली.

पण त्या पलीकडे जाऊन काही गंभीर मुद्द्यांची चर्चा सुरू करत असताना राहुल गांधींनी बजेटच्या हलवा समारंभाचा उल्लेख केला. त्याचा फोटो लोकसभेत फडकवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशाला हलवा वाटण्याचे हे बजेट केवळ 20 लोकांनी तयार केले आहे. याची माहिती आम्ही माहिती घेतली, तेव्हा यात फक्त एक मायनॉरिटी आणि एक पिछडा आहे, असे समजले. पण त्यांना मागे टाकून दिले. या फोटोत त्यांना घेतलेही नाही, असा दावा करून राहुल गांधींनी बजेटच्या हलवा समारंभात एकही दलित आदिवासी किंवा ओबीसी नाही, असे सांगितले.

वास्तविक राहुल गांधी केंद्रीय अर्थसंकल्पातील काही गंभीर तरतुदींबद्दल बोलत होते. त्यांना जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे रेटायचा होता, पण तो पुढे रेटताना त्यांनी बजेटच्या हलवा समारंभाचा अप्रस्तुत असा उल्लेख केला. शिवाय लोकसभा किंवा राज्यसभेत कुठलाही फलक किंवा फोटो फडकवण्याची परवानगी नसताना हलवा समारंभाचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतःच्या डोक्याला हात लावला आणि त्या हसल्या. परंतु राहुल गांधींनी त्याचाही विपरीत अर्थ काढला.

– राहुल गांधी म्हणाले :

– या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, महिला, छोटे उद्योजक यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. उलट उद्योगविश्वावर एकाधिकारशाही असेलेल्या मोठ्या उद्योजकांच्या फायद्याचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांना हमीभावाची खात्री देणाऱ्या कायद्यावरही भाष्य केले नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डोक्याला हात का लावला? 

अर्थसंकल्पात देशातील सर्व प्रवर्गांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. फोटोमध्ये बजेटचा हलवा वाटला जात असल्याचं दिसतंय. या अधिकाऱ्यांत एकही ओबीसी अधिकारी नाही, एकही दलित अधिकारी नाही, एकही दलित अधिकारी नाही. देशात हे काय चाललंय. देशाचा हलवा वाटला जातोय आणि यामध्ये देशातील 73 % जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतिनिधीच नाहीत.

– सगळा हलवा हेच खात आहेत. फक्त 20 अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार केला. माझ्याकडे त्यांची नावे आहेत. म्हणजेच भारताचा हलवा वाटण्याचे काम या 20 लोकांनी केले. पण या 20 पैकी फक्त एक अधिकारी अल्पसंख्याक तर एक ओबीसी अधिकारी आहे. या फोटोमध्ये तर एकही अधिकारी नाही. म्हणजेच फोटो काढताना तुम्ही त्या दोन अधिकाऱ्यांना मागे ढकललं. म्हणूनच अर्थसंकल्पात जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा यावा असे मला वाटत होते. देशातले 95 % भारतीय लोकांना जातीनिहाय जनगणना हवी आहे. कारण या लोकांना आमची भागिदारी किती आहे, हिस्सेदारी किती आहे, हे जाणून घ्यायचे आहे.

अर्थमंत्री हसल्या, ही हसण्याची बाब नाही

राहुल गांधी यांनी ही भूमिका मांडल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना हसू आले. हीच बाब लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी सीतारामन यांच्यावरही टीका केली. ‘अर्थमंत्री हसत आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. ही हसण्याची बाब नाही. मी जातीनिहाय जनगणनेवर बोलत आहे. जातिनिहाय जनगणना केली तर देशात बदल घडेल, असे राहुल गांधी निर्मला सीतारामन यांना उद्देशून म्हणाले. राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेनंतर निर्मला सीतारामन यांनीदेखील होकारार्थी मान हलवली होती.

पण अर्थसंकल्पावरचे काही गंभीर मुद्दे मांडत असताना राहुल गांधींनी अस्थानी बजेट मधल्या हलवा समारंभाचा उल्लेख केला आणि त्यातही जात घुसवली, त्यामुळे निर्मला सीतारामन यांना हसू आले आणि त्यांनी डोक्याला हात लावला होता.

– नड्डा यांचे काँग्रेसला बोचरे सवाल

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावर भाषण केले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे वाभाडे काढले. काँग्रेस आम्हाला ओबीसी एससी एसटीच्या मुद्द्यावर ज्ञान देते. आज मी काँग्रेसला सवाल करतो, राजीव गांधी फाउंडेशन मध्ये किती बीसी, ओबीसी, एससी, एसटी आहेत??, यूपीए सरकारच्या काळात नॅशनल एडवाईजरी कौन्सिल होते. त्यामध्ये किती ओबीसी होते??, सगळे निर्णय सर्वोच्च समिती घेत असे. तिच्यात किती ओबीसी किंवा बीसी होते??, याचे काँग्रेसने उत्तर द्यावे. उलट काँग्रेसचे नेते कायम आरक्षणाच्या विरोधात होते. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत सगळ्यांनी आरक्षणाला वेगवेगळ्या कारणांनी विरोध केला होता, याची आठवण यांनी राज्यसभेत करून दिली.

– सीतारामन यांचे तिखट सवाल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी पहिले पंतप्रधान पंडित नेहरू नंतरचे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे काही कोट्स पासून दाखवले. त्यामध्ये त्यांनी आरक्षणाला कसा आणि कोणत्या कारणांनी विरोध केला होता याबद्दल त्यांनी काँग्रेसचे वाभाडे काढले. आरक्षणाच्या नावाखाली इडियट्स मी भरती करू देणार नाही, असे राजीव गांधी म्हणाले होते. आज काँग्रेस जातींचा उल्लेख करून भाजपला टार्गेट करत आहे. पण इंदिरा गांधींनी, “ना जात पर, ना पात पर; मुहर लगेगी हाथ पर!!”, अशी घोषणा दिली होती, याची आठवण सीतारामन यांनी काँग्रेसला करून दिली.

निर्मला सीतारामन यांनी देखील काँग्रेसला राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांमध्ये किती ओबीसी, एससी, एसटी आहेत??, असा सवाल केला. यावेळी त्यांनी या ट्रस्टींची सगळी यादी हातात ठेवली होती. पण ती मी वाचून दाखवणार नाही, कारण सगळ्यांना ते माहिती आहे, असा टोला त्यांनी काँग्रेसला हाणला.

Nadda and Sitharaman question Rahul Gandhi’s remarks on caste issue.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात