विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतल्या सगळ्याच घटक पक्षांनी जोरदार मार खाल्ला असला, तरी पक्षांतर्गत आणि महाविकास आघाडी अंतर्गत राजकारण करण्यामध्ये यातले कुठलेही घटक पक्ष मागे नाहीत. महाराष्ट्राची सत्ता तर निवडणुकीतून निघून गेली, पण आता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली. या रस्सीखेचित आपल्याच शिवसेनेचा नंबर लागावा यासाठी उद्धव ठाकरेंनी आधीच चलाखी करून ठेवली आहे. MVA opposition leader Uddhav Thackeray
Bharat Todo : भारत तोडो’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयत्व बळकट करण्याची गरज; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन
एकतर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असला तरी 20 आमदारांसह उद्धव ठाकरेंची शिवसेनाच पहिल्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ 16 आमदारांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानावर, तर 10 आमदारांसह शरद पवारांचे राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. त्यामुळे विधानसभेतले विरोधी पक्ष नेतेपद मिळणारच असेल, तर ते शिवसेनेलाच मिळू शकते. कारण आकड्यांच्या खेळात शिवसेना इतर पक्षांच्या पुढे आहे उद्धव ठाकरेंनी हा आकड्यांचा खेळ ओळखून शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाची रचना अशा पद्धतीने करून ठेवली की त्यातून विरोधी पक्ष नेते पद आले तर ते आदित्य ठाकरेंकडेच घेता येईल.
उद्धव ठाकरेंनी शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड केली, तर विधानसभेतल्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड केली. त्यामुळे प्रोटोकॉल नुसार आदित्य ठाकरे हे भास्कर जाधव यांच्या वरच्या पदावर बसलेत. शिवाय ते विधानसभेत निवडूनही आले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद संख्याबळाच्या आधारावर द्यायचेच ठरले, तर ते शिवसेनेकडे येईल आणि त्यातही विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून ते आदित्य ठाकरेंकडे येऊ शकेल, ही चलाखी उद्धव ठाकरेंनी आधीच महाविकास आघाडीत करून ठेवली आहे. विरोधी पक्षनेते पदाच्या राजकारणात देखील माध्यमनिर्मित चाणक्यांचा पक्ष नेहमीप्रमाणे मागे पडला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App