विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : समान नागरी कायद्याला विरोध का होतोय हे प्यू रिसर्च सेंटरच्या अभ्यासातून समोर आले आहे. ७८ टक्के मुस्लिमांचा भारतीय कायद्यांपेक्षा शरीयतवर विश्वास आहे. ८० टक्यांवर मुस्लिम पुरुषांना मुस्लिम महिलांनी गैरमुस्लिम पुरुषासोबत लग्न केल्याचे आवडत नाही.Muslims believe in Sharia more than Indian law, women oppose marriage to non-Muslims, Pew Research Center study reveals
प्यू रिसर्च फाऊंडेशनतर्फे रिलीजियन इन इंडिया, टॉलरन्स अॅँड सेग्रेगेशन नावाने एक अभ्यास केला. सुमारे ३० हजार भारतीयांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये २२,९७६ हिंदू, ३३३६ मुस्लिम, १७६२ शिख, १,०११ ख्रिश्चन, ७१९ बौध्द, १०९ जैन नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
यातील बहुतांश लोकांनी म्हटले की त्यांच्या धर्माचे पालन करण्यास कोणताही अडसर नाही. मात्र, तरीही धार्मिक कारणांमुळे बहुतांश लोक हे आपल्याच धर्मातील लोकांसंबंध राहणे पसंत करतात. आंतरधर्मीय विवाहांना मुस्लिम समाजातून सर्वाधिक विरोध आहे. ८० टक्के मुस्लिमांना मुस्लिम महिलांनी इतर धर्मीय पुरुषांशी विवाह करणे पसंत नाही.
त्याचबरोबर ७६ टक्के मुस्लिमांना वाटते की मुस्लिम पुरुषाने इतर धर्मातील महिलेशी विवाह करू नये. हिंदू समाजात मात्र ६५ टक्के लोकांचाच आंतरधर्मीय विवाहास विरोध आहे.पोर्क खाण्यास मुस्लिम समाजाचा तीव्र विरोध आहे. ७७ टक्के मुस्लिम म्हणतात की पोर्क खाणारा खरा मुस्लिम असूच शकत नाही. हिंदूमध्ये ७२ टक्के लोकांचा गोमांसाला विरोध आहे. बिफ खाणारा हिंदू नाही असे ७२ टक्के हिंदू मानतात.
इस्लामी शरीयतवर ७४ टक्के मुस्लिमांचा विश्वास आहे. त्यांना असे वाटते की कौटुंबिक वाद हे शरीयतनुसारच सोडविले जावेत. शरीयतनुसार काझींनीच न्यायनिवाडा करावा असे त्यांना वाटते.सच्चा भारतीय असण्यासाठी हिंदूच असणे गरजेचे आहे, असे 64 टक्के हिंदूंना वाटते.
97 टक्के भारतीयांचा परमेश्वरावर विश्वास आहे आणि हिंदी भाषेचा वापर करणे म्हणजे खरे भारतीय असल्याची ओळख आहे, असे 80 टक्के लोकांना वाटते. देशभरातील 84 टक्के लोकांना आपण खरे भारतीय असल्याचे वाटते. या लोकांनी आपल्याला इतर धर्मांबद्दल आदर असल्याची भावना व्यक्त केली.
आपण आपल्या धमार्चे पालन मुक्त आणि योग्य वातावरणात करू शकतो, असे भारतातील सहा प्रमुख धमार्तील लोकांना वाटते. या सहाही प्रमुख धमार्तील लोकांना आपल्या धर्मात आणि इतर धर्मात फार काही साम्य वाटत नाही. तसेच या लोकांचे बहुतांश खास मित्र हे त्यांच्याच धमार्तील असल्याचे समोर आले आहे.
1947 साली देशात जी धर्माच्या आधारे फाळणी झाली ती हिंदू-मुस्लिम एकात्मतेसाठी धोकादायक ठरली, असे दहापैकी सात मुस्लिमांना वाटते. तर केवळ 37 टक्के हिंदूंना असे वाटते. तर फाळणी ही हिंदू-मुस्लिम एकात्मतेसाठी धोकादायक असल्याचे मत 66 टक्के शिखांनी मांडले आहे.
प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणातून धर्मांतर होत असले तरी धर्मांतराचा सर्वाधिक फायदा हा ख्रिश्चन समाजाला मिळत आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या ०.४ टक्के लोक आधी हिंदू होते. ख्रिश्चन धर्मामधून धर्मांतर करणाऱ्यांचे प्रमाण केवळ ०.१ टक्का इतकं आहे. धर्मांतर करणाऱ्यांमधील ५० टक्के लोक हे अनुसूचित जातींमधील आहेत. १४ टक्के धर्मांतरित लोक हे अनुसूचित जमातीमधील आहेत.
२६ टक्के लोक हे ओबीसी आहेत. हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाºयांंपैकी ४५ टक्के लोकांनी भारतात प्रामुख्याने अनुसूचित जातींमधील व्यक्तींसोबत भेदभाव केला जात असल्याचं मत व्यक्त केलं आहे. जातीपातीचा भेदभाव हेच धर्मांतरण करण्याचं प्रमुख कारण असल्याचं ४५ टक्के लोकांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App