विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. मविआच्या 269 उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. याशिवाय बोर्ड वंचित, एमआयएम, सपा, बविआसह अपक्ष उमेदवारांनादेखील पाठींबा देणार आहे. संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा सज्जाद नोमानी केली.
संभाजीनगरात AIMIM ला नव्हे, सपा उमेदवारांना पाठिंबा
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने एमआयएमच्या काही निवडक उमेदवारांना पाठींबा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरात एमआयएम दोन जागा लढत आहे. या दोन्ही जागांवर पर्सनल लॉ बोर्डाने एमआयएमच्या जागी समाजवादी पक्षाला पाठींबा दिला आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना बोर्डाचा पाठींबा नाही. सपाच्या अब्दुल गफार कादरी, इर्शाद जहागीरदार यांना बोर्डाने पाठींबा दिलेला आहे. एमआयएमच्या मुफ्ती इस्माईल, फारुख शाब्दी यांना समर्थन देण्यात आलेलं आहे.
वसई-विरार पट्ट्यात ताकद असलेल्या बहुजन विकास आघाडीला मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने समर्थन दिले आहे. मविआच्या हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, डॉ. राजेश पाटील यांना पाठींबा जाहीर करण्यात आलेला आहे. वंचितच्या एस. एन. खातिब, फारुख अहमद यांनाही समर्थन देण्यात आले आहे.
sharad pawar and ajit pawar काका – पुतण्यांची निवडणुकीच्या ऐन मध्यात जुंपली; अदानींना घेतले मधी!!
या ठिकाणी पाठिंबा
राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यापैकी 269 जागांवर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड महाविकास आघाडीला पाठींबा देणार आहे. तर अन्य 16 जागांवर त्यांचे समर्थन वंचित, एमआयएम, सपा, बविआसह अपक्ष उमेदवारांना असेल. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते नोमानी यांनी मुंबईतील पत्रकार परिषद घेत कोणकोणत्या समाजाच्या किती उमेदवारांना पाठींबा देणार, त्यांची यादीच वाचली. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड 169 मराठा, ओबीसी, 53 एससी-एसटी, 23 मुस्लीम आणि 40 अन्य समुदायाच्या उमेदवारांना पाठींबा देत असल्याची आकडेवारी नोमानी यांनी जाहीर केली.
उद्धव ठाकरेंची कोंडी
हिंदुत्त्व सोडल्याची टीका भाजप, शिंदेसेनेकडून उद्धव ठाकरेंवर करण्यात येते. लोकसभा निवडणुकीत ठाकरेसेनेचे उमेदवार अल्पसंख्याक मतांमुळे निवडून आल्याचा दावा भाजप, शिंदेसेना, मनसेने केला होता. आता मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने मविआला पाठिंबा दिल्याने ठाकरेंची कोंडी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App