वृत्तसंस्था
भोपाळ : ‘जय श्रीराम’ लिहिल्याने भोपाळमध्ये मुस्लीम व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. भाजप आमदाराच्या फेसबुक पोस्टवर त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ‘जय श्रीराम’ लिहिले. त्यामुळे त्याला मुस्लिम धर्मातील कट्टरपंथीय व्यक्तींनी मारहाण केली आहे. Muslim fanatics beat up Muslim man in Bhopal for writing ‘Jai Shriram’
भोपाळमध्ये भाजप आमदारच्या फेसबुक पोस्टवर ‘जय श्री राम’ कमेंट केल्याने एका मुस्लीम व्यक्तीला त्याच्याच समाजातील नागरिकांनी मारहाण केली. इतकेच नाही तर, त्याच्या पत्नीला देखील मारहाण केली असून, चार वर्षांच्या मुलीला देखील उचलून खाली आदळले. कंमेट करणाऱ्या त्या व्यक्तीला मारहाण करणारे मुस्लीम समाजातील देशद्रोही म्हणत आहे. त्याच्या घराची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.
मुनव्वर अंसारी, असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याच समाजातील नागरिकांनी त्यांना मारहाण केली आहे. मुनव्वर अंसारी कारपेंटरचे व्यवसाय करतात. त्यांचे म्हणणे आहे की, ते भाजपा आमदार रामेश्वर शर्मा यांचे समर्थक आहेत. आमदाराने केलेल्या फेसबुक पोस्टला लाईक आणि कमेंट केल्यावरुन त्याला मारहाण करण्यात आली आहे.
आपल्या सर्मथकासोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आमदार शर्मा यांनी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सध्या तरी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more