प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना भवनासमोर वाजलेल्या भोंग्या मनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेचा “संपलेला पक्ष” म्हणून प्रचार करायला सुरुवात केली आहे.Aditya Thackeray’s propaganda of MNS as “finished party” after the bells rang
आज रामनवमी निमित्त मनसेने शिवसेना भवनासमोर भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवला. पोलिसांनी तातडीने कारवाई करून मनसेच्या गाडीवरचे भोंगे उतरवले. त्यानंतर मनसेने शिवसेना भवन म्हणजे मशीद आहे का? तेथे हनुमान चालीसा लावला तर काय होते? शिवसेनेला काही अडचण आहे का?, असे खोचक सवाल केले. मात्र त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मनसेच्या भोंग्यांवर प्रश्न विचारल्यानंतर “संपलेल्या पक्षावर” मी काही बोलत नाही, असे त्यांनी उत्तर दिले.
याचा अर्थ वाजलेल्या भोंग्या नंतर आदित्य ठाकरे यांनी मनसेचा “संपलेला पक्ष” म्हणून प्रचार करायला सुरुवात केल्याचे दिसून येते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात मशिदींवरचे भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा वाजवून, असा इशारा दिला होता. त्यानंतर अनेक मनसैनिकांनी मशिदींसमोर भोंगे लावले. परंतु पोलिसांनी तातडीने कारवाई करून मनसेचे भोंगे उतरवले. मशीन वरचे भोंगे मात्र तसेच ठेवले.
– राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा
आता 12 तारखेला राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा होणार आहे. त्याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. असे असताना आदित्य ठाकरे यांनी या उत्तर सभेपूर्वी मनसेचा “संपलेला पक्ष” म्हणून प्रचार करायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App