प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरला तब्बल 21 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी पदाची गदा मिळवून देणाऱ्या पृथ्वीराज पाटील याने आपल्याला नुसतीच गदा मिळाली, पण बक्षिसाची रक्कम मिळाली नाही, अशी खंत त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्यक्त केली आहे. त्यानंतर संयोजक दीपक पवार यांनी सातारा तालीम संघाने कुस्तीच्या सर्व आयोजनाचा खर्च केला आहे. विजेच्या पैलवानाला बक्षीस देण्याची जबाबदारी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची आहे. मात्र त्यांनी बक्षिसाची रक्कम मागितली तर आम्ही त्याला तयार आहोत, असे म्हटले आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.Maharashtra Kesari Prithviraj Patil complains that he did not receive the prize money
– भाजपा करणार पृथ्वीराजचा सत्कार
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर भाजपच्या वतीने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याचा 5 लाख रुपये बक्षीस देऊन भव्य सत्कार करण्यात येणार आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
देवेंद्र फडणवीस यांनी काल सायंकाळी कोल्हापूर उत्तर मध्ये भाजप उमेदवार नाना कदम यांच्या प्रचारासाठी मोठी सभा घेतली. आज पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याचा 5 लाख रुपये देऊन भाजपा सत्कार करण्यात असल्याची घोषणा केली.
एकीकडे कोल्हापूरला पृथ्वीराज पाटील याने 21 वर्षांनंतर महाराष्ट्र केसरी पदाची गदा मिळवून दिली. पण त्याच्या हातात बक्षिसाची रक्कम मिळाली नाही. तर दुसरीकडे बक्षिसाची रक्कम स्पर्धेच्या संयोजकांनी द्यायची की कुस्तीगीर परिषदेने द्यायची यावर वाद सुरू आहे. दरम्यानच्या काळात भाजपने मात्र पृथ्वीराज पाटील याला पाच लाख रुपये रक्कम देण्याचे जाहीर केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more