वृत्तसंस्था
मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई पोलीसांचा माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि शिवसेना नेता प्रदीप शर्मापर्यंत पोहोचले असून एनआयएने त्यांच्या घरावर आज पहाटे छापा घातला.Mumbai: NIA conducts raid at the residence of Shiv Sena leader and former ‘encounter specialist’ of Mumbai Police, Pradeep Sharma
आज सकाळी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतल्या निवासस्थानी एनआयएच्या टीमने छापा घातला असून अद्यापही त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना एनआयए अटक करण्याची शक्यता आहे. शर्मा यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वीच एनआयएने प्रदीप शर्माच्या दोन निकटवर्तीयांना अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रदीप शर्माच्या घरी छापे टाकण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते.
https://twitter.com/ANI/status/1405377157921050628?s=20
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास्थानाजवळ सुमारे अडीच किलो जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणात एनआयएने सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यास अटक केली. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयएकडे असून या दोन्ही प्रकरणात वाझेच्या संपर्कात प्रदीप शर्मा होते, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App