अँटिलिया स्फोटके प्रकरणात सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत वाढ; एनआयए, न्याययंत्रणेवर विश्वासाची वाझेंच्या भावाची ग्वाही

वृत्तसंस्था

मुंबई – अँटिलिया स्फोटके प्रकरणाच तपास पूर्ण करण्यासाठी पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एनआयए आणि न्याययंत्रणेवर पूर्ण विश्वास असल्याची ग्वाही सचिन वाझेचे भाऊ सुधर्म वाझे यांनी दिली आहे. We have complete faith in NIA & judiciary,” says Sudharm, brother of Sachin Waze

अँटिलिया स्फोटके प्रकरणात तसेच मनसुख हिरेन प्रकरणात तपासासाठी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीमध्ये आहेत. त्यांची कोठडी संपल्यामुळे आज त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर केले. अधिक तपासासाठी एनआयएकडून सचिन वाझेंच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य करत विशेष एनआयए कोर्टाने सचिन वाझेंची पोलीस कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास देखील एनआयए करत असत असून त्या प्रकरणी देखील सचिन वाझेंची चौकशी सुरू आहे. या तपासात अनेक खुलासे झाल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले.

आधी अँटिलियाबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात सचिन वाझेंविरोधात एनआयएला पुरावे मिळाल्यानंतर आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील सचिन वाझेंचाच हात असल्याची बाब समोर आली आहे. सचिन वाझे यांच्याशी संबंधित या प्रकरणातील ७ ते ८ कार एनआयएने ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले विनायक शिंदे आणि बुकी अशा दोघांनीही या प्रकरणात सचिन वाझे सामील असल्याची कबुली दिली आहे.

सचिन वाझेने मिठी नदीत फेकलेला लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस एनआयएकडे आल्याने त्याची छाननी करण्यात येत आहे. त्यातून नवनवे पुरावे समोर येत आहेत.

We have complete faith in NIA & judiciary,” says Sudharm, brother of Sachin Waze

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*