Sachin Vaze Case NIA Reveals that Sachin Vaze Stayed at five star hotel using fake ID

Sachin Vaze Case : फेक आयडी वापरून सचिन वाझे थांबले होते पंचतारांकित हॉटेलमध्ये, नावही होते बनावट

Sachin Vaze Case : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या केसमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू आहे. अँटिलिया प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. एनआयएने सोमवारी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये शोध घेतला, तेथे मुंबई क्राइम ब्रँचचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अटकेपूर्वी थांबले होते. दरम्यान, एजन्सीला समजले की वाझे यांनी बनावट आधार कार्डचा वापर करून हॉटेलमध्ये बुकिंग केले होते, त्यामध्ये खोट्या नावासोबत त्यांचा फोटो होता.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाच्या बाहेर (Sachin Vaze Case) स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या केसमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू आहे. अँटिलिया प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. एनआयएने सोमवारी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये शोध घेतला, तेथे मुंबई क्राइम ब्रँचचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अटकेपूर्वी थांबले होते. दरम्यान, एजन्सीला समजले की वाझे यांनी बनावट आधार कार्डचा वापर करून हॉटेलमध्ये बुकिंग केले होते, त्यामध्ये खोट्या नावासोबत त्यांचा फोटो होता.

मीडिया रिपोर्टनुसार, एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पथकाने नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये एका खोलीची झडती घेतली, जिथे वाझे 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत थांबले होते. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वाझे हॉटेलमध्ये बनावट आयडी वापरून राहण्याच्या तारख त्या तारखांशी सुसंगत आहेत, जेव्हा वाझे हे एका पथकाचे सदस्य होते ज्यांनी परवाना अटींचे उल्लंघन केल्याबद्दल रात्री मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्याच काळात वाझे यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर विभागातही काम केले होते.

एनआयएच्या पथकाने हॉटेलच्या खोलीत काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत, परंतु त्यात काय आहे ते समजू शकलेले नाही. या पथकाने तपासणीसाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, 13 मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातही आरोपी आहेत.

हिरेनच्या पत्नीने नोंदवला जबाब

एनआयएच्या टीमने मृत हिरेन यांच्या पत्नी विमला यांचाही जबाब नोंदवला. हिरेन यांचे भाऊ विनोद म्हणाले की, एनआयएचे पथक घरी आले होते. त्यांनी आम्हाला तपासाची माहिती दिली. याशिवाय त्यांनी एटीएसकडूनही सर्व माहिती घेणार असल्याचे सांगितले. अद्यापपर्यंत माझ्या भावाच्या हत्येचा गुन्हा अधिकृतपणे नोंदवलेला नाही. या प्रकरणातील अधिक माहिती घेऊन ते येत्या दोन दिवसांत आम्हाला भेटायला येत असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. ते थोडा वेळ थांबून निघून गेले.

दरम्यान, रविवारी हिरेनच्या हत्येप्रकरणी एटीएसने दोन जणांना अटक केली. विनायक शिंदे, माजी कॉन्स्टेबल आणि नरेश गोरे, बुकी. एन्काउंटरप्रकरणी दोषी ठरलेल्या शिंदे यांना साथीच्या रोगामुळे मागील वर्षी तुरुंगवासादरम्यान पॅरोलवर सोडण्यात आले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*