An Idea Can Change your Life : D-Mart Founder राधाकिशन दमानी यांची कहाणी : ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’च मुंबईत 1000 कोटीचं नवं घर

  • राधाकिशन दमानी यांनी मुंबईत तब्बल 1000 कोटी रुपयांचं घर घेतलं आहे. मुंबईतील पॉश एरिया  मलबार हिल्समध्ये 5752.22 चौरस फुटांचं हे अलिशान घर .
  • राधाकृष्ण दमानी भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती
  • डी-मार्ट रिटेल चेन चालविणार्‍या कंपनीचे संस्थापक
  • दमानीची एकूण संपत्ती सुमारे 17.5 अब्ज डॉलर्स

विशेष प्रतिनिधी 

मुंबई  : राधाकिशन दमानी यांच आयुष्य केवळ 24 तासात बदललं आणि  एक सामान्य गुंतवणूकदार यशस्वी उद्योगपती झाला.. डी मार्टचे राधाकिशन दमानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राधाकिशन दमानी यांनी मुंबईत तब्बल 1000 कोटी रुपयांचं घर घेतलं आहे . An Idea Can Change Your Life: The Story of D-Mart Founder Radhakishan Damani : ‘Mr White and White’ is a new house worth Rs 1000 crore in Mumbai

मुंबईतील पॉश एरिया असलेल्या मलबार हिल्समध्ये 5752.22 चौरस फुटांचं हे अलिशान घर आहे. राधाकिशन दमानी आणि त्यांचे भाऊ गोपीकिशन यांनी पुरचंद रॉयचंद अँड सन्स, परेशंद रॉयचंद अँड सन्स, प्रेमचंद रॉयचंद अँड सन्स यांच्याकडून हे घर खरेदी केलं.

या घराचं बाजार मूल्य 724 कोटी रुपये आहे. त्यावरील विविध शुल्कासह घराची किमत 1 हजार कोटीच्या घरात जाते.

फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत (Forbes India’s rich list of 2020) दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 12 हजार कोटी इतकी आहे.

राधाकिशन दमानी यांचा प्रवास –

राधाकिशन दमानी यांची सुरुवात शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणुकीने झाली. मात्र एका आयडियाने त्यांचं आयुष्य बदललं. केवळ 24 तासात त्यांचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढले.

राधाकिशन दमानी यांच्या बॉल बेअरिंगचा किरकोळ व्यवसाय होता. मात्र त्यात काही परवडत नसल्यामुळे तो बंद झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु केली. चांगल्या संधी शोधून छोट्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरु केली.

वर्ष 1990 मध्ये त्यांनी गुंतवणुकीतून कोट्यवधी कमावले होते. त्यानंतर त्यांनी किरकोळ व्यापारात उतरण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज त्यांच्या कंपनीचं बाजारमूल्य 1.88 लाख कोटी रुपये आहे.

राधाकिशन दमानी हे नेहमी पांढऱ्या कपडे परिधान करतात. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये ते ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ म्हणून परिचीत आहेत. त्यांनी 1999 मध्ये रिटेल बिझनेस सुरु केला होता.

त्यावेळी कुमार मंगल बिर्ला आणि फ्युचर ग्रुपचे किशोर बियानींची पावलं इकडे वळलीही नव्हती. राधाकिशन दमानींचा प्रमुख सल्ला म्हणजे, कोणत्याही कंपनीची नेहमी कर्जाची रक्कम तपासा, तसंच अल्पकाळासाठी पैसे गुंतवणे टाळा.

कोणत्याही एका क्षेत्राऐवजी, प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या शेअर्सवर लक्ष ठेवा. शेअर खरेदी करण्यापूर्वी ते कधी विकायचे हे आधीच ठरवा. बाजारात उतरण्यापूर्वी आपल्याला किती रक्कम गुंतवायची आहे, हे लक्षात ठेवा, असं दमानी सांगतात.

An Idea Can Change Your Life: The Story of D-Mart Founder Radhakishan Damani : ‘Mr White and White’ is a new house worth Rs 1000 crore in Mumbai

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*