स्टोक पार्क, बकिंगहॅमशायर, लंडन येथे 300 एकरची मालमत्ता घेतली, जिथे ते कुटुंबासह स्थायिक होईल.Mukesh Ambani prepares to settle in UK, report reveals
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आता कुटुंबासह दुसऱ्या देशात स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत.पाश्चिमात्यांचा मार्ग पत्करत त्यांनी यासाठी ब्रिटनची निवड केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. म्हणजेच अंबानींचे दुसरे घर आता लंडनमध्ये असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, अंबानी कुटुंब लंडनला स्थलांतरित करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी स्टोक पार्क, बकिंगहॅमशायर, लंडन येथे 300 एकरची मालमत्ता घेतली, जिथे ते कुटुंबासह स्थायिक होईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांचे ब्रिटनमधील आलिशान घर पूर्ण झाले आहे. त्यांनी स्टोन पार्कमध्ये 592 कोटी रुपयांमध्ये एक आलिशान घर तयार केले असून त्यात 49 हून अधिक खोल्या, स्विमिंग पूल, मिनी हॉस्पिटल, क्लब, ऑडिटोरियम, पार्क, ओपन एरिया आहे. तर घरासाठी वेगळा रस्ता तयार करण्यात आला आहे.
हे आलिशान घर 300 एकरपेक्षा जास्त जागेत तयार करण्यात आले आहे. घरात विशेष मंदिराची स्थापना केली आहे. राजस्थानमधून संगमरवरी बनवलेल्या श्रीकृष्ण, हनुमान आणि गणेशाच्या मूर्ती तेथे नेऊन स्थापित केल्या आहेत. बातम्यांनुसार, मंदिराची रचना अगदी तशीच आहे जी त्यांनी मुंबईतील घर आणि ऑफिसमध्ये ठेवली आहे.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात अंबानी कुटुंबाला दुसऱ्या घराची गरज भासू लागली. मोकळ्या जागेच्या घराची गरज त्यांच्या लक्षात आली, त्यानंतर स्टोनपार्कच्या या घराचा व्यवहार झाला आणि आता हे घर तयार झाले आहे. वृत्तानुसार, दिवाळीच्या पूजेनंतर अंबानी कुटुंब पुढील वर्षी एप्रिलमध्ये येथे शिफ्ट होऊ शकते. मुकेश अंबानी मुंबई आणि लंडन या दोन्ही ठिकाणी आपला वेळ घालवतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App