पाच पिढ्यांच्या शिल्पकार घराण्याने साकारली केदारनाथमधील आद्य शंकराचार्यांची मूर्ती!!


वृत्तसंस्था

मैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक केदारधाम मध्ये आद्य शंकराचार्य यांच्या समाधीस्थानी शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण केले आहे. ही मूर्ती साकारली आहे पाच पिढ्या ज्यांच्याकडे मूर्तिकला चालत आली, त्यापैकी एका मूर्तीकाराने…!! अरुण योगीराज असे या मूर्तिकाराचे नाव आहे.  The sculptor family of five generations made the idol of Adya Shankaracharya in Kedarnath !!

अरुण योगीराज यांनी आद्य शंकराचार्य यांच्या जीवनावर अभ्यास केला आहे. कृष्णशिलेमध्ये त्यांनी ही तब्बल 13 फूट उंचीची शंकराचार्यांची मूर्ती साकारली आहे. यामध्ये शंकराचार्य बसलेल्या भागापर्यंतची उंची चार फूट आहे आणि उरलेले नऊ फूट हा त्यांचा आसनाचा बेस आहे. ही मूर्ती साकारताना परंपरेबरोबरच आधुनिकतेचा ही मिलाफ साधण्यात आला आहे. कृष्णशिलेमध्ये मूर्ती आणि मंदिरे यांचे असे काम गेल्या हजारो वर्षांपासून दक्षिणेत केले जाते. अरुण योगीराज यांच्या पाच पिढ्या या मूर्ती कामात आहेत. त्यांचे आजोबा बी. बसवण्णा यांना पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकार म्हणून पारितोषिक मिळाले आहे.


केदारनाथ धाम पंतप्रधान मोदींसाठी का आहे खास?, चार वर्षांत पाचव्यांदा भेट, 2019 मध्ये येथे 17 तास केली साधना…


आद्य शंकराचार्य यांची मूर्ती साकारताना त्रिमितीय अभ्यास करून कृष्ण शिलेमध्ये ती साकारली आहे. कृष्णशिलेचा रंग गडद निळा असतो. त्यावर नारळाचे तेल आणि भुसा या मिश्रणातून काळपटपणा आणला जातो आणि मग मूर्ती घडविली जाते. उत्तराखंड सारख्या राज्यात संपूर्ण विषम हवामानात कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी ही मूर्ती सक्षम आहे. एसिड, आग, पाणी यांच्यापासून तिला धोका उत्पन्न होणार नाही अशा पद्धतीने ती बनवण्यात आली आहे, असे अरुण योगीराज यांनी स्पष्ट केले आहे.

आद्य शंकराचार्य ची मूर्ती साकारण्यास 11 महिन्यांचा कालावधी लागला. आधी त्याचे छोटे क्ले माॅडेल बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखविण्यात आले. त्यांच्या मंजुरीनंतरच मूर्तीचे अंतिम काम आम्हाला मिळाले. कोणतीही मूर्ती कोणत्याही कलावंताला एकदाच साकारता येते.त्यात करेक्शन ला फारसा वाव नसतो. त्यामुळे अचूक काम करावे लागते, असेही अरुण योगीराज यांनी स्पष्ट केले आहे.

अरुण योगीराज यांचे आजोबा बी. बसवण्णा यांचे काम पंडित नेहरूंना पसंत पडले, तर त्यांचे नातू अरुण योगीराज यांचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंत पडले. दोन पंतप्रधानांच्या प्रशंसेला पात्र ठरलेले हे शिल्पकारांचे घराणे आहे.

The sculptor family of five generations made the idol of Adya Shankaracharya in Kedarnath !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात