वृत्तसंस्था
हल्दवानी : उत्तराखंडमधील हल्दवानीमध्ये मुस्लिम कट्टरतावाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा ठपका जमीयत उलेमा ए हिंदचे मुफ्ती अब्दुल रजिक यांनी उत्तराखंड पोलिसांवरच ठेवला आहे. त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याचाही आरोप केला आहे. मुफ्तींच्या या वक्तव्यामुळे हिंसक जमावाचे समर्थन झाले आहे. जमावाला एक प्रकारची चिथावणी मिळाली आहे.Mufti Abdul Raziq of Jamiat Ulema e Hind blames Haldwani violence on the police!!
हल्दवानी मध्ये बनफूलपुरा भागात बेकायदा मदरसा आणि मशीद तोडण्याचे काम उत्तराखंडच्या प्रशासनाने केले. त्यावेळी महिला आणि मुलांना समोर उभे करून त्यांच्यामागून मुस्लिम कट्टरतावाद्यांनी पोलीस आणि प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. त्यामुळे 100 पेक्षा अधिक कर्मचारी जखमी झाले. या कर्मचाऱ्यांच्या जबानीतूनच कट्टरतावाद्यांची मोडस ऑपरेंडी समोर आली. त्यानंतर पोलिसांनी केंद्रीय अर्धसैनिक बलाच्या कंपन्या मागून हल्वानीमध्ये शांतता निर्माण केली.
पण हिंसाचाराला चार दिवस उलटून गेले. त्यानंतर दिल्लीचे जमियत उलेमा ए हिंदचे मुफ्ती अब्दुल रजिक हल्दवानीत गेले. तिथे त्यांनी पोलिसांवरच हिंसाचाराचा ठपका ठेवला. बेकायदा मशीद आणि मदरसा याविषयी कोर्टात केस चालू होती. कोर्टाने 14 फेब्रुवारीची तारीख दिली होती. त्या आधीच प्रशासनाने कारवाई केली आणि मदरसा – मशीद पाडून टाकले. त्यामुळे जमाव चिडला आणि त्यांनी दगडफेक केली, अशी कबुली मुक्तींनी दिली पण पोलिसांनीही दगडफेक केली, असा आरोप मुफ्तींनी केला.
मुफ्तींच्या या वक्तव्यामुळे कट्टरतावादी जमावाला हिंसाचाराची चिथावणीच मिळाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार महिला आणि मुलांनाच समोर ठेवून त्यांच्या मागून कट्टरतावादी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. मात्र याची कबुली मुफ्तींनी दिली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App