खासदार मेनका गांधींनी ‘इस्कॉन’वर केला गंभीर आरोप, म्हणाल्या…

 

इस्कॉनने मेनका यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपा खासदार मेनका गांधी यांनी इस्कॉनवर गंभीर आरोप केले आहेत. इस्कॉन आपल्या गोठ्यातील गायी कसाईंना विकते, असा दावा मेनका गांधी यांनी केला आहे. दुसरीकडे, इस्कॉनने मेनका यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले असून, भाजपा खासदाराच्या आरोपांमुळे संघटना आश्चर्यचकित झाल्याचे म्हटले आहे. MP Maneka Gandhi made a serious allegation on ISKCON

काय म्हणाल्या मेनका गांधी? –

माजी केंद्रीय मंत्री आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या मेनका गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या इस्कॉन ही सर्वात मोठी फसवणूक असल्याचे सांगत आहेत. हे लोक गोशाळेची देखरेख करतात आणि सरकार त्यांना सर्व प्रकारे मदत पुरवते, ज्यामध्ये जमिनीचाही समावेश होतो. असे असतानाही ज्या गायी दूध देत नाहीत त्या कसायाच्या ताब्यात दिल्या जातात, असं त्यांनी म्हटलं आहे.

आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील इस्कॉनच्या गोशाळेचा उल्लेख करताना मेनका म्हणतात, ‘एकदा मी तिथे गेलो होते. संपूर्ण गोशाळेत एकही गाय आढळली नाही जिने दूध दिले नाही. तसेच एकही बछडा सापडला नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ते (इस्कॉन) दूध न देणाऱ्या गायी आणि वासरे विकतात.

मेनका गांधी पुढे म्हणतात की इस्कॉन आपल्या सर्व गायी कसाईंना विकते. ज्याप्रकारे हे लोक वागत आहेत, त्याप्रकारे कोणीही वागत नाही. हेच लोक ‘हरे राम हरे कृष्ण’ म्हणत रस्त्यावर फिरतात आणि म्हणतात की आपलं संपूर्ण आयुष्य दुधावर अवलंबून आहे. तसेच, ‘कदाचित यांनी जेवढ्या गायी कसाईंना विकल्या असतील तेवढ्या कोणीही  विकल्या नसतील.’ असंही मेनका गांधी यांनी म्हटलं आहे.

MP Maneka Gandhi made a serious allegation on ISKCON

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात