विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : ख्रिसमसच्या काळात मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेची भारतातील सर्व खाती गोठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला आहें.Mother Teresa’s Missionaries of Charity accounts froze, Mamata Banerjee attacks central government
केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयामुळे या संस्थेतील जवळपास २२ हजार रूग्ण आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच त्यांना कोणत्याही औषधांविना रहावं लागेल, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
कायदा सर्वश्रेष्ठ असला तरी मानवी दृष्टीकोनातून सुरू असलेल्या कामांवर निर्बंध नको, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर निवेदन जारी करत आपली बाजू मांडली आहे.
एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार गुजरात पोलिसांकडून मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेची चौकशी सुरू आहे. संस्थेविरोधात बालकल्याण मंडळाने तक्रार दाखल केल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली. या तक्रारीत संस्थेवर निवारागृहात मुलींना बायबल वाचण्याची आणि क्रॉस घालण्याची सक्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुली राहत असलेल्या निवारागृहाच्या ग्रंथालयात १३ बायबल सापडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.मिशनरीज ऑफ चॅरिटी ही संस्था १९५० मध्ये मदर तेरेसा यांनी स्थापन केली. मदर तेरेसा यांनी कोलकात्यात राहून जात, पंथ, धमार्चा विचार न करता मोठ्या प्रमाणात गरिबांची मदत आणि सेवा केली.
त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही देण्यात आला. १९९७ मध्ये मदर तेरेसा यांचा मृत्यू झाला. यानंतर २०१६ मध्ये तेरेसा यांना पोप फ्रान्सिस यांनी संत पदवी दिली.केंद्राकडूनही कारवाई झालीय का आणि झाली असेल तर का यावर कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App