तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान


हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ.अब्राहम मथाई सोहळ्यात उपस्थित होते.Tulsi Gowda awarded Mother Teresa Memorial Award by Governor Bhagat Singh Koshyari


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हार्मनी फाउंडेशनतर्फे सोमवारी (दि. 13) राजभवन येथे आयोजित पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ.अब्राहम मथाई उपस्थित होते.

या सोहळ्यात कर्नाटकातील ज्येष्ठ आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सामाजिक परिवर्तनासाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.



तुलसी गौडा या वनराईचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून परिचित आहेत.मुंबई येथील युवा पर्यावरण कार्यकर्ती आद्या जोशी तसेच मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभोजीत मुखर्जी यांना देखील मदर तेरेसा स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आ

ले.तसेच राज्यपालांच्या हस्ते दुष्काळमुक्त महाराष्ट्र साकारण्यासाठी कार्य करीत असलेल्या ‘पानी फाउंडेशन’च्या डॉ.अविनाश पोळ यांना देखील सन्मानित करण्यात आले.

Tulsi Gowda awarded Mother Teresa Memorial Award by Governor Bhagat Singh Koshyari

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात