विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू येथे ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट अनेक दिवसांपासून शिजत असल्याचे उघड झाले आहे.आॅगस्ट २०१९ नंतर पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तीनशेहून अधिक ड्रोन दिसले, अशी माहिती केंद्रीय सुरक्षा संस्थांकडून देण्यात आली आहे.More than 300 drones spotted near border
सीमा सुरक्षेतील विविध सुरक्षा संस्था पश्चिम सीमेलगत दाट जंगली परिसर, वाळवंट आणि दलदलीच्या परिसरात ड्रोनविरुद्ध विकसित करण्यात आलेल्या काही भारतीय तंत्रप्रणालीची चाचणी करीत आहे. सीमा सुरक्षा दल आणि विविध पोलीस दलांची सीमावर्ती पथके ३,३२३ किलोमीटरच्या सीमेवर ड्रोन, अज्ञात उडत्या वस्तू किंवा दूर नियंत्रित वायुयान दिसताक्षणीच पाडण्याची मानक संचालक प्रक्रिया तयार करत आहे.
शत्रूंचे ड्रोन पाडण्याची सध्याची प्रणाली अशी आहे की, सुरक्षा रक्षकांना जमिनीवर सतर्क राहून ड्रोन दिसताच पाडावे लागते.केंद्रीय सुरक्षा संस्थेने गोळा केलेली आकडेवारी आणि सरकारला याबाबत दिलेल्या माहितीनुसार सीमा सुरक्षा दल आणि सीमावर्ती पोलिसांना ५ आॅगस्ट २०१९ पासून तीनशेहून अधिक ड्रोन दिसले आहेत.
५ आॅगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० मधील बव्हंशी तरतुदी रद्द करून जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्यात आले आले होते.पश्चिम सीमेवर (मुख्यत: जम्मू आणि पंजाब) २०१९ मध्ये १६७ , मागच्या वर्षी ७७ आणि या वर्षी आतापर्यंत ६६ वेळा ड्रोन दिसले.
एखादे लष्करी ठिकाण किंवा परिसराच्या सुरक्षेसाठी सध्या एका गोलाकार ड्रोनविरोधी सुरक्षा प्रणाली उपलब्ध आहे. सीमा सुरक्षेसाठी ड्रोन रोखणे, ठप्प करणे आणि नष्ट करणाऱ्या प्रणालीसारखी एक रेखीय सुरक्षा प्रणाली उपलब्ध नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App