कोव्हॅक्सिनबरोबरच कोव्हिशिल्डचे डोस घेणाऱ्यांनाही युरोपियन देशात अडचणी


विशेष प्रतिनिधी

पुणे : भारतीय लसींना नाकारण्याचा यरोपियन युनियनचा फटका आता कोव्हिशिल्ड लसीलाही बसला आहे. ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राजेनिकाच्याच फॉर्म्युल्यावर बनलेल्या कोव्हिशिल्ड लसीला यरोपियन मेडिसिन एजन्सीने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे युरोपियन देशांमध्ये व्हिसा मिळविताना अडचणी येणार आहेत.Problems in European countries for those who take covachield

युरोपियन युनियनच्या युरोपियन मेडिसिन एजन्सीने ग्रीन ट्रॅव्हल पास ही संकल्पा राबविण्याचे ठरविले आहे. यामध्ये फायझर, मॉडर्ना, ऑ क्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनिका या लसींचे दोन्ही डोस घेतले असतील, तरच त्या व्यक्तींना युरोपात येताना अथवा युरोपमधून इतरत्र जाताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी नियमावली तयार केली आहे.



कोव्हिशिल्ड ही ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राजेनिकाच्याच फार्म्युल्यावर असतानाही नाकारण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनिका कंपनीतर्फे विकसित केलेल्या लसीचे भारतात सिरम इन्स्टिट्यूटतर्फे ”कोविशिल्ड” या नावाने उत्पादन केले जात आहे.

या लसीला युरोपियन मेडिसिन एजन्सीची मान्यता मिळाली नसल्याने कोविशिल्डचे डोस घेतलेल्याना युरोपियन देशात काही अडचणींचा सामना करावा लागत .सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी सोमवारी याबाबत ट्विट केले.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविशिल्ड घेतलेल्या बऱ्याच भारतीयांना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करताना समस्येचा सामना करावा लागत आहे, असे समजते आहे. मी सर्वांना हमी देतो की उच्च स्तरावर बोलणी करून आणि राजनैतिक पातळीवर लवकरच याबाबत तोडगा काढला जाईल.”

कोविशिल्ड लसीचा डेटा न मिळाल्याने युरोपियन मेडिसिन एजन्सीने परवानगी दिलेली नाही. लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनिका कंपनीने विकसित केली असल्याने त्याच नावाने असलेल्या लसीला मान्यता आहे.

कोविशिल्ड घेतलेले विद्यार्थी, डिपेंडंट, पर्यटक यांना अडचणी येत आहेत. १४ दिवस क्वारंटाईन होणे, आरटीपीसीआर टेस्ट करणे ही सर्व प्रक्रिया खूप खर्चिक आणि वेळखाऊ आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बरेचदा लसीकरण धोरणावर परिणाम दिसून येतो. पुढील काही दिवसांमध्ये यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे.

Problems in European countries for those who take covachield

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात