Mohan Bhagwat लोकसंख्येच्या घटत्या अनुपातावर मोहन भागवत बोलले; तर ओवैसी + जयंत पाटील एकाच सूरात विरोधात गेले!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतातल्या लोकसंख्येच्या घटत्या अनुपातावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलले, तर असदुद्दीन ओवैसी आणि जयंत पाटील एकाच सूरात त्यांच्या विरोधात गेले.

एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारतातल्या लोकसंख्येच्या घटत्या अनुपाताविषयी म्हणजेच प्रमाणाविषयी चिंता व्यक्त केली. जेव्हा लोकसंख्येचा अनुपात 2:1 होतो किंवा त्यापेक्षा जास्त घसरतो, त्यावेळी तो समाज टप्प्याटप्प्याने नष्ट होत जातो. हे लोकसंख्याशास्त्र सांगते. त्याचा सांस्कृतिक आर्थिक, सामाजिक, दुष्परिणाम होतो, असा इशारा मोहन भागवतांनी दिला. समाजातले संतुलन राखण्यासाठी एकापेक्षा किंबहुना दोन पेक्षा अधिक मुले आता जन्माला घातली पाहिजेत त्यातून समाजाचे संतुलन टिकेल, असे मोहन भागवत म्हणाले.

मात्र, मोहन भागवतांच्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणे विपरीत अर्थ काढत खासदार असदुद्दीन ओवैसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील एका सूरात मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या विरोधात बोलले. भारताची लोकसंख्या आधीच वाढलेली असताना आणि ती नियंत्रणात ठेवणे गरजेचे असताना डॉ. मोहन भागवत यांनी जास्त मुले जन्माला घालण्याचे वक्तव्य कसे काय केले??, असा सवाल जयंत पाटील यांनी केला, भारताची लोकसंख्या जास्त वाढली तर भारतातल्या संसाधनांवर प्रचंड ताण वाढेल असे ते म्हणाले, तर जास्त मुले जन्माला घालण्यासाठी लाडकी बहीण योजनेसारखी एखादी योजना आणा, असा खोचक सल्ला असदुद्दीन ओवैसी यांनी दिला. जास्त मुले जन्माला घातली तर संघ सगळ्यांना पैसे देणार का असा सवाल देखील ओवैसी यांनी केला.

मोहन भागवतांनी लोकसंख्या शास्त्राच्या आधारे केलेल्या वक्तव्याचा शास्त्रीय दृष्ट्या प्रतिवाद दोघांनी केला नाही पण भागवतांनी व्यक्त केलेल्या भावनांविरुद्ध मात्र जयंत पाटील आणि असदुद्दीन ओवेसी एका सूरात बोलले.

Mohan Bhagwat spoke on the declining population ratio

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात