विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय खेळाडू मोहम्मद शमीच्या आक्रमक गोलंदाजीची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. विश्वचषक स्पर्धेत त्याने आतापर्यंत १६ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंड व श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने तब्बल ५ विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. या कामिगिरीमुळे शमीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बॉलीवूडपर्यंत सर्वत्र शमीचं कौतुक केलं जात आहे. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी करणाऱ्या या गोलंदाजाला एका अभिनेत्रीने थेट लग्नाची मागणी घातली आहे. सोशल मीडियावर या प्रपोजलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. Mohammed Shami news
अभिनेत्री पायल घोष हे हिंदी आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. मध्यंतरी पायल ‘मी टू’ चळवळीत केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आली होती. आता अभिनेत्री मोहम्मद शमीला लग्नाची मागणी घातल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पायल घोषने ट्वीट करत शमीला लग्नासाठी विचारलं आहे. परंतु यामध्ये तिने एक महत्त्वाची अट ठेवली आहे.
“शमी तू इंग्रजी सुधार…मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे.” अशी अजब ठेवत पायल घोषने मोहम्मद शमीला लग्नासाठी विचारलं आहे. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App