Mohammad Yunus मोहम्मद युनूस यांच्या विरोधात अमेरिकेत निदर्शने; संतप्त बांगलादेशींची न्यूयॉर्कच्या हॉटेल बाहेर घोषणाबाजी!!

Mohammad Yunus

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : Mohammad Yunus बांगलादेशात शेख हसीना यांना हटवून विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली इस्लामी जिहादींनी सत्ता हस्तगत केली. तिच्या प्रमुख पदावर नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांना नेमले, पण त्यामुळे बांगलादेशी सरकारची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुधारली नाही. याचा प्रत्यय मोहम्मद युनूस यांच्या अमेरिका दौऱ्यात आला. शेकडो संतप्त बांगलादेशींनी मोहम्मद युनूस न्यूयॉर्कमध्ये राहत असलेल्या हॉटेल समोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. Mohammad Yunus

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी ढोल नगारे वाजवून स्वागत केले, तर दुसरीकडे मोहम्मद युनूस यांना आपल्या पहिल्याच अमेरिका दौऱ्यात संतप्त बांगलादेशींच्या निदर्शनांचा सामना करावा लागला. Mohammad Yunus

 

मोहम्मद युनूस यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली घटनाबाह्य पद्धतीने सत्ता बळकावली. त्यांच्यामुळे इस्लामी जिहादी संघटना सत्तेवर कब्जा करून बसल्या. शेख हसीनांचे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आले होते. त्यांना हटवून इस्लामी जिहादींना बांगलादेश बळकवायचा होता म्हणूनच त्यांनी मोहम्मद युनूस यांना यांचा मुखवटा धारण करून सत्ता बळकावली, असा आरोप शेख जमिल या निदर्शकाने केला. Mohammad Yunus

इस्लामी जिहादींच्या राजवटीत हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध या अल्पसंख्यांकांच्या मंदिरांवर घरांवर हल्ले वाढले. बांगलादेशात सर्व नागरिक समान आहेत. परंतु, मोहम्मद युनूस यांच्या सरकारने जिहादींना मोकळे रान करून दिल्याने बांगलादेशात अराजक माजले आहे. जागतिक पातळीवर बांगलादेशची प्रतिमा ढासळली आहे, असा आरोप निदर्शकांनी केला.

Mohammad Yunus took the power unconstitutionally

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात