विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या हातातून काढून घेतल्यानंतर नवीन मुद्द्याच्या शोधात असणाऱ्या विरोधकांनी प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेला मुद्दा राजकीय चर्चेच्या मध्यस्थानी आणायचा प्रयत्न चालविला आहे. तो म्हणजे #ModiVsYogi हा ट्विटरवरचा ट्रेंड…!! #ModiVsYogi trends on twitter; but who is behind it?
#ModiVsYogi ट्रेंड चालवून यूपीतल्या राजकारणाला फोडणी देण्याचा नवा फंडा विरोधकांनी काढला आहे. त्यामध्ये मीडियाचा विशिष्ट वर्गही सामील झाला आहे, की जो नेहमी काँग्रेसी राजकारणाच्या रिपोर्टिंग स्टाइलने भाजपचे देखील रिपोर्टिंग करत असतो.
https://twitter.com/Homidevang29/status/1402332189920923654?s=20
#ModiVsYogi हा ट्रेंड बरेच तास ट्विटरवर टॉप १० मध्ये होता. जणू काही आता मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यात जबरदस्त वाद पेटलाय आणि योगींनी मोदींना आव्हान दिल्याने योगींची खुर्ची धोक्यात आली आहे. त्यांची लवकरच हकालपट्टी करून त्यांच्या जागी उत्तर प्रदेशाला नवा मुख्यमंत्री मिळेल, अशा कंड्या #ModiVsYogi य़ा ट्रेंडच्या आधारे पिकविल्या गेल्या. त्याच्या बातम्या देखील चॅनेलवर चालविण्यात आल्या.
The joy of seeing #ChotaFanta fall & the cauldron of hate crumble🤞🏼 “If the BJP can’t deliver UP in the upcoming state elections (scheduled for Feb next year) widely seen as a semi final for Modi 3.0 then BJP will be in political trouble” @bainjal https://t.co/Xby9KPQwBH — Be the Change👊🏻 aka Jennifer Fernandes (@nandtara) June 8, 2021
The joy of seeing #ChotaFanta fall & the cauldron of hate crumble🤞🏼 “If the BJP can’t deliver UP in the upcoming state elections (scheduled for Feb next year) widely seen as a semi final for Modi 3.0 then BJP will be in political trouble” @bainjal https://t.co/Xby9KPQwBH
— Be the Change👊🏻 aka Jennifer Fernandes (@nandtara) June 8, 2021
हीच ती काँग्रेसचे रिपोर्टिंग करण्याची स्टाइल… काँग्रेसमधले नेत्यांचे परस्पर विरोधी गट एकमेकांविरोधातील बातम्या देत असतात. त्या बातम्यांमनध्ये आपल्या माहितीची आणि विश्लेषणाची भर घालून चटकदार, मसालेदार बातमी बनवायची वर्षानुवर्षे बातमीदारांना सवय लागली. काँग्रेस पक्ष असाच फक्त गटबाजीच्या आधारावर चालतो, असा समज तयार करण्यापर्यंत त्यांच्या बातमीदारीची मजल पोहोचली. त्यावर अनेकांची बातमीदारीची गुजराण चालली. नेमक्या त्याच स्टाइलने #ModiVsYogi या ट्रेंडच्या बातम्या चालविल्या गेल्या. किंबहुना हा ट्रेंडच त्या बातम्यांच्या आधारे चालविला गेला.
पण देशातली आणि उत्तर प्रदेशातली राजकीय वस्तुस्थिती तशी आहे काय… हे तपासले गेले नाही. उलट वस्तुस्थितीच्या नेमकी उलटी बातमीदारी करण्यात आली. यूपीत काँग्रेसच्या स्टाइलची गटबाजी भाजपमध्ये नाही. मोदींना आव्हान देण्याइतपत तर अजिबात नाही. योगींना मोदी आणि अमित शहांचा भक्कम पाठिंबा आहे. राज्यात समाजवादी, बसप, काँग्रेस हे पक्ष अजून जागे होण्यापूर्वी भाजपने निवडणूकीची तयारी सुरू देखील केलेली आहे. यामध्ये योगींचा पुढाकार आहे. केंद्रातले नेते आढावा बैठकांसाठी दोनच दिवसांपूर्वी येऊन गेले.
https://twitter.com/HarshidDesai1/status/1402133094753214477?s=20
मंत्रिमंडळ विस्तारपासून ते संघटन विस्तारापर्यंत सविस्तर चर्चा त्यांनी केली. पण यात कुठेही योगींना बदलण्याची दूर – दूरपर्यंत चर्चा नव्हती. म्हणून मग #ModiVsYogi हा ट्रेंड चालविण्यासाठी मालमसाला गोळा करण्यात आला. आधी त्याच्या बातम्या चालविल्या. मोदींनी योगींच्या वाढदिवशी शुभेच्छा कशा दिल्या नाहीत, याचा शोध लावण्यात आला. या शोधाच्या सूतावरून #ModiVsYogi या ट्रेंडचा स्वर्ग गाठण्यात आला… बाकी काही नाही…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App