T20 वर्ल्ड कप जिंकताच मोदींचा टीम इंडियाला फोन; रोहित + विराट सह सगळ्यांवर कौतुकाचा वर्षाव!!

Modi's phone call to Team India after winning the T20 World Cup

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंची थेट संवाद साधण्याचा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालही जारी ठेवला विजय असो अथवा पराभव पंतप्रधान मोदी खेळाडूंशी संवाद साधतातच, तसाच संवाद त्यांनी काल भारताने टी-ट्वेंटी चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय टीमशी साधला. बार्बेडोस मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारत आणि t20 चा वर्ल्डकप जिंकल्यावर पंतप्रधान मोदींनी कॅप्टन रोहित शर्माला फोन केला. Modi’s phone call to Team India after winning the T20 World Cup

पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भारतीय संघाशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी मोदींनी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळल्याबद्दल शाबासकी दिली, तर विराट कोहलीने अंतिम सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना केलेल्या 76 धावांच्या खेळीचे कौतुक केले. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. काल विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती.



मोदींकडून सूर्याकुमार यादवच्या अफलातून कॅचचे कौतुक

नरेंद्र मोदी यांनी सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा सीमारेषेवर अफलातून झेल पकडला होता. इथेच या सामन्याला कलाटणी मिळाली होती. पंतप्रधान मोदी यांनी सूर्यकुमार यादवच्या या कॅचचे कौतुक केले. याशिवाय, मोदींनी जसप्रीत बुमराहच्या कामगिरीचीही तारीफ केली.

भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटवर एक व्हीडिओही पोस्ट केला होता. त्यामध्ये मोदींनी म्हटले होते की, आपल्या संघाने दिमाखदार अंदाज ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकला आहे. आम्हाला भारतीय संघाच्या या कामगिरीचा गर्व आहे. भारतीय संघाने देशातील प्रत्येक गावगल्लीतील लोकांची मनं जिंकली आहेत. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना हारला नाही, ही उल्लेखनीय गोष्ट असल्याचे मोदींनी म्हटले होते.

पंतप्रधान मोदींनी केवळ टीम इंडिया जिंकली म्हणून फोन केला असे नाहीतर आत्तापर्यंत मोदींनी अनेकदा खेळाडूंची थेट संवाद साधताना पराभवानंतर त्यांचे सांत्वन देखील केले आहे. भारतीय महिला हॉकी टीम ऑलिंपिक मध्ये अंतिम सामन्यात हरली, त्यावेळी देखील मोदींनी फोन करून महिला खेळाडूंचे सांत्वन केले होते. त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले होते. खेळत हारजीत असतेच आपण स्पिरिटने खेळले पाहिजे असे मोदी म्हणाले होते.

Modi’s phone call to Team India after winning the T20 World Cup

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात