केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या दाव्याबद्दल चिराग बोलत होते.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) माजी अध्यक्ष चिराग पासवान यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांचे दिवंगत वडील रामविलास पासवान यांच्या राजकीय वारशावरील त्यांच्या दाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला आहे. Modis endorsement of my claim on my fathers political legacy Chirag Paswan
रामविलास पासवान यांचे योग्य उत्तराधिकारी असल्याचा काका आणि केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या दाव्याबद्दल विचारले असता चिराग म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत कोणती जागा लढवायची हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) संयुक्तपणे ठरवेल.” पण माझ्या वडिलांच्या वारशावर असलेल्या माझ्या दाव्याला पंतप्रधानांनी आधीच पाठिंबा दिला आहे, जे युतीतील सर्वात मोठे नेते आहेत.
चिराग पासवान ‘NDA’मध्ये जाणार असल्याची चिन्ह ; केंद्रीय मंत्रिमंडळात मिळू शकते स्थान!
पारस यांच्या २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रॅलीबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. पारस यांचा शक्तीप्रदर्शन म्हणून या रॅलीकडे पाहिले जात आहे. पारस हाजीपूरचे विद्यमान खासदार आहेत आणि चिरागने आईसाठी जागा मागितल्याचा राग आहे.
पासवान म्हणाले, “ याशिवाय जेव्हा पंतप्रधानांनी अशातच तेलंगणातील एक सभेत बिहाचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना माझ्या वडिलांबद्दल गैरवर्तण केल्यावरून फटकारले होते. तेव्हा त्यांनी माझे नाव घेतले होते, आपल्या मंत्रीमंडळातील अन्य कुणाचे नाही. चिराग म्हणाले की, त्यांच्या वडिलांना मरणोत्तर जाहीर करण्यात आलेला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी केंद्रकाडून त्यांना आमंत्रित केले गेले होते, त्यांच्या काकांना नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App