केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिराग पासवान राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील होणार असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या राजकीय हालचालींदरम्यान त्यांनी रविवारी सकाळी पाटणा येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. Sign of Chirag Paswan going to NDA Can get a place in the Union Cabinet
बैठकीत पक्षश्रेष्ठींनी चिराग पासवान यांना आगामी निवडणुकांबाबत कोणत्याही प्रकारच्या युतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले. त्यामुळे १८ जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत चिराग पासवान सहभागी होऊ शकतात, असे मानले जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर चिराग पासवान यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, असे वृत्त आहे. यापूर्वी चिराग पासवान यांचे काका आणि केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी एनडीटीव्हीला सांगितले होते की, चिराग पासवान एनडीएमध्ये सामील झाल्यास त्यांचे स्वागत तर करणार नाही पण विरोधही करणार नाही.
विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला लोजपच्या दोन्ही गटांना सोबत ठेवायचे आहे. त्याचवेळी पक्ष बिहारमध्ये उपेंद्र कुशवाह, जितन राम मांझी आणि मुकेश साहनी यांनाही सोबत घेत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more