समान नागरी कायद्याची बात मोदींनी केली; विरोधकांना जळजळीत मिरची लागली!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : समान नागरी कायद्याची बात मोदींनी केली आणि विरोधकांना जळजळीत मिरची लागली!!, असे आज 27 जून 2023 रोजी घडले. Modi talked about Common Civil Law; Opponents were furious

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अमेरिका आणि इजिपच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतात परत येऊन पहिला कार्यक्रम घेतला, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये. तेथे त्यांनी 5 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवे झेंडे दाखवण्याबरोबरच भाजपच्या 10 लाख बूथ कार्यकर्त्यांना संबोधित केले. आतापर्यंत भाजपचा हा सर्वात मोठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी प्रश्न उत्तरांचे सेशन घेतले आणि यातूनच मोदींनी समान नागरी कायद्याची बात छेडली आणि देशात राजकीय खळबळ उडाली.

एकाच देशात कुटुंबांसाठी दोन वेगवेगळे कायदे लागू असू शकत नाहीत. ते योग्य नाही. सुप्रीम कोर्टाने देखील देशात समान नागरी कायदा लागू करण्याची सूचना वारंवार केली. पण व्होट बँकेच्या राजकारणात अडकलेल्या पक्षांनी समान नागरी कायद्याचे अंमलबजावणी होऊ दिले नाही, असा आरोप करून मोदींनी आपले सरकार समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत असल्याचा इरादा बोलून दाखविला. त्यामुळेच देशात प्रचंड खळबळ उडाली आणि विरोधकांना मिरची लागली.

काँग्रेस पासून सगळ्याच विरोधी पक्षांमध्ये मोदींच्या समान नागरी कायद्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी धडपड उडाली. काँग्रेस नेत्यांपासून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यापर्यंत सर्व विरोधकांनी समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी आक्षेप घेतला त्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा हवाला दिला.

पंतप्रधानांनी देशातली बेरोजगारी गरिबी महागाई या प्रश्नांवर उत्तर द्यावे. गेले 60 दिवस मणिपूर जळते आहे. त्यावर पंतप्रधानांनी बोलावे. पण त्यांनी तसे केले नाही. कारण त्यांना मुख्य विषयांपासून देशातल्या जनतेचे लक्ष हटवायचे आहे आणि म्हणूनच ते वेगळेच विषय समोर आणत आहेत, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी केला.

पंतप्रधान मोदींना संविधानातील अनुच्छेद 29 माहिती नाही. तो एक मौलिक अधिकार आहे. संविधान धर्मनिरपेक्ष आहे. मुस्लिमांमध्ये लग्न हे कॉन्ट्रॅक्ट आहे, तर हिंदूंमध्ये लग्नही जन्मजन्मांतरीची साथ आहे. आता तुम्ही हे सगळे एक करणार का?? भारताची विविधता तुम्हाला समजते का??, तुम्ही भारताच्या विविधतेला “समस्या” समजत आहात, असा आरोप एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

पंतप्रधान इजिप्त – पाकिस्तानचे उदाहरण का देतात?? तिथल्या मुसलमानांचा भारतीय मुसलमानांशी संबंध काय??, पंतप्रधान बाकीच्या देशातल्या मुसलमानांपेक्षा भारतीय मुसलमानांना कमी का समजतात??, हा देशद्रोह आहे, असा आरोप ओवैसी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाबासाहेब यांच्या संविधानाची शपथ घेतली आहे हे लक्षात ठेवावे त्यांनी दिलेले संविधान भारतातली जनता बदलू देणार नाही असा दावा काँग्रेसचे नेते आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कार्यकारी सदस्य आरिफ मसूद यांनी केला.

मोदींच्या वक्तव्याचा जेडीयू नेता के. सी. त्यागी आणि बिहार सरकार मधील मंत्री विजयकुमार चौधरी यांनी देखील निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात धार्मिक ध्रुवीकरण करू इच्छित आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Modi talked about Common Civil Law; Opponents were furious

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात