मोदी + शाह + शिवराज मामांनी मध्य प्रदेशचा “गुजरात” केला; काँग्रेसचा बेडा नर्मदेत बुडवला!!

 

नाशिक : लोकसभा 2024 च्या सेमी फायनल निवडणुकांमध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल मध्य प्रदेशात लागल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ भाजपचे कमळ कोमेजणार असा तर्क राजकीय पंडितांनी मांडला होता पण तो “कुमार केतकरी कुतर्क” ठरला. उलट कमळानेच कमलनाथांना कोमेजून टाकले. Modi – shah – shivraj made history in madhya Pradesh like gujrat, retained power for forth time!!

मध्य प्रदेशात मोदी + शाह + शिवराज मामांनी काँग्रेसचा बेडा नर्मदेत बुडवला… पण हे करताना या तिन्ही नेत्यांनी मध्य प्रदेशचा “गुजरात” करून दाखवला!!

मध्य प्रदेशचा “गुजरात” करणे या वाक्याचा नीट अर्थ समजून घेतला पाहिजे. मध्य प्रदेश आणि गुजरात यांची राजकीय परिस्थिती समान होती. तिथे भाजपचेच विद्यमान सरकार होते आणि ते टिकवणे भाजप पुढे मोठे आव्हान होते, हे आव्हान मोदी शाह आणि शिवराज सिंह चौहान या त्रिकूटाने व्यवस्थित पेलले.

गुजरात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपचे भाजपमध्ये योग्य वेळी सगळ्या भाकऱ्या फिरवल्या. अख्खे मंत्रिमंडळ बदलले. विजय रूपाणी पंजाबचे प्रभारी करून गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून उतरवत गुजरातची कमांड भूपेंद्र पटेल या नवख्या नेत्याकडे दिली. गुजरात मध्ये भाजपने 52 आमदारांना घरी बसवून नव्या तरुण कार्यकर्त्यांना तिकिटे दिली होती. याचा परिणाम गुजरात निवडणुकीत दिसला आणि 154 आमदारांच्या प्रचंड बहुमतासह भूपेंद्र पटेल सरकार पुन्हा गुजरातमध्ये प्रस्थापित झाले होते. त्याआधी 2016 च्या गुजरात मधले भाजपचे बहुमत अवघ्या 99 आमदारांवर येऊन ठेपले होते. 2021 च्या निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये 154 आमदार मिळवले.

मध्य प्रदेशात देखील गुजरात सारखेच आव्हान होते. तेथे शिवराज सिंह चौहान यांना अँटी इन्कमबन्सी फॅक्टर भोवणार असा माध्यमांचा होरा होता. काँग्रेस देखील त्याच मस्तीत होती. कमलनाथ आपले एकहाती वर्चस्व मध्य प्रदेशात टिकवून ठेवू इच्छित होते. 2018 ची पुनरावृत्ती आपण करून दाखवू, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे त्यांनी एकाच वेळी ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह या दिग्गज नेत्यांना दुखावून ठेवले होते.

काँग्रेस पराभवातून कधीच धडा शिकत नाही. आपल्या गटबाजीचे राजकारण थांबवत नाही. गटबाजीचे राजकारण काँग्रेसच्या डीएनए मध्ये आहे हे तीनही दुर्गुण कमलनाथ यांनी दाखविले होते. अखेर त्याचाच परिणाम मध्य प्रदेशच्या निवडणुकीत दिसला. शिवराज मामांना अँटी इन्कम्बनसीचा फटका देणे तर, दूरच उलट काँग्रेसमधल्या अंतर्गत भांडणाचा फटका कमलनाथ यांना सहन करावा लागला.

त्या उलट भाजपने एकाच वेळी 3 केंद्रीय मंत्री, 7 खासदार विधानसभा निवडणुकीत तिकिटे देऊन प्रत्यक्ष रणमैदानात उतरविले. उमेदवारांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले. निवडणुकीची स्ट्रॅटेजी जास्तीत जास्त बूथ केंद्रित केली. शिवराज मामांनी आपली प्रतिमा मध्य प्रदेशातल्या सर्व बहिणींचा भाऊ अशी ठळक केली आणि त्यामुळे राज्यात संपूर्ण राज्यात महिला मतदारांची टक्केवारी तब्बल 2 % नी वाढली. ही वाढच शिवराज मामांना “सरताज” बनवून गेली, इतकेच नाहीतर मोदी शाह आणि शिवराज मामा या त्रिकूटाने मध्य प्रदेशचा “गुजरात” करून दाखवला

Modi – shah – shivraj made history in madhya Pradesh like gujrat, retained power for forth time!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात