काँग्रेस खासदाराने 200 कोटींच्या नोटांनी भरली कपाटं आणि खोकी; मोदींनी दिली लुटीचे पैसे वसूल करण्याची गॅरंटी!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या कंपन्यांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने टाकलेल्या छाप्यांमध्ये 200 कोटींच्या नोटांनी भरलेली कपाटं आणि खोकी सापडली. त्याचे फोटो ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या लुटीच्या पैशांच्या पुरत्या वसुलीची गॅरंटी दिली!! Modi gave a guarantee to recover the looted money

काँग्रेसचे झारखंड मधले राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कंपन्यांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने घातलेल्या छाप्यांमधून तब्बल 200 कोटींच्या नोटा सापडल्या. त्यांची मोजणी करताना मशीन मोडले. आणखी किती नोटा सापडतील याची इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना देखील गॅरेंटी नाही, पण सापडलेली मालमत्ताच एवढी प्रचंड आहे की त्यामुळे काँग्रेसच्या या खासदाराने कुठून कसा आणि किती पैसा गोळा केला??, याचा हिशेबच लागेनासा झाला आहे.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मूळ धोरणानुसार ज्यांनी जितके खाल्ले, ते सगळे वसूल करू. पै पै चा हिशेब घेऊ, असे आश्वासन दिले. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर नोटांनी भरलेल्या कपाट आणि खोक्यांचा फोटो शेअर करून या काँग्रेस नेत्यांच्या प्रामाणिकपणाच्या नुसत्या गप्पा आणि भाषणे ऐका आणि हे फोटो पाहा, जनतेकडून लुटलेला हा पैसा पाहा… पण जनतेच्या लुटलेल्या पैशाची वसुली करू. पै पै चा हिशेब घेऊ,ही मोदीची गॅरंटी आहे, असे लिहिले. त्यामुळे सापडलेल्या नोटांच्या बंगलांबरोबरच पंतप्रधान मोदींचे ट्विटही सोशल मीडियावर गाजले.

इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी बुधवारी काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या बौद्ध डिस्टिलरी प्रा. लि. कंपनीच्या झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा 3 राज्यांतील 10 ठिकाणांवर हे छापे घातले. तिथून ही रक्कम जप्त केली. तेव्हापासून जप्त रोकड मोजण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 200 कोटींहून अधिकची रक्कम मोजली असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा 250 कोटींच्या आसपास आहे. ओडिशामध्ये सर्वाधिक रोकड सापडली आहे. 6 डिसेंबरपासून सुरू असलेली कारवाई अद्यापही सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यातील सुदापाडा येथे छापेमारी केली असता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना 150 हून अधिक खोकी आढळून आली, ज्यात नोटा भरल्या होत्या. त्या मोजण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने मोजणी यंत्र आणली पण ती कमी पडली त्यामुळे नोटा मोजण्याचे काम संथ गतीने सुरू राहिले.

पीटीआय या वृत्तसंस्थेने साहू यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, सदर कारवाईवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

कोण आहेत खासदार धीरज साहू?

खासदार धीरज साहू हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. जुलै 2020 मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेवर गेले होते. काँग्रेस पक्षाकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. धीरज साहू हे झारखंड राज्यातील आहेत. झारखंडमधील ते काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात.

Modi gave a guarantee to recover the looted money

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात