Modi 3.0 : मंत्र्यांची नावे आणि खाती अद्याप गुलदस्त्यातच, पण माध्यमांची पतंगबाजी सुरूच!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच इशारा दिल्याप्रमाणे मंत्र्यांची नावे प्रसारमाध्यमांपासून गुलदस्त्यातच आहेत, पण प्रसारमाध्यमांची नावांची आणि मंत्र्यांच्या खात्यांची पतंगबाजी सुरू आहे.Modi 3.0 : Names and accounts of ministers still in the bouquet, but the media kite-flying continues!!

मोदी सरकार मधून कुठलीही बातमी लीक होत नाही. मंत्र्यांची किंवा राज्यपालांची नावे समजत नाहीत अशी तक्रार इंडिया टुडेज प्रमुख अरुण पुरी यांनी केली होती. ती “तक्रार” अजूनही कायमच आहे मोदी सरकार मधल्या कुठल्याच मंत्र्यांची नावे अधिकृतरित्या अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र सगळ्याच माध्यमांनी आपल्या हातात लागली तशी नावे प्रसिद्ध करून परस्पर खाते वाटपही केले आहे. अर्थात हे सगळे कळते – समजते या नावाने प्रसिद्ध झाले आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा आज सायंकाळी पार पडणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर ३० नवनिर्वाचित खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या सत्तास्थापनेसाठी जनता दल (यु) आणि तेलगु देसम पक्ष या दोन पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जनता दलाचे नितीश कुमार आणि तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणती खाती जातील हे पाहावे लागणार आहे.

तेलुगु देसम आणि जनता दल युनायटेडमुळे ‘एनडीए’ बहुमतापर्यंत पोहोचला. तेलुगु देसमने लोकसभा सभापती पदासह माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाची तर जनता दलाने रेल्वे मंत्रालयाची मागणी केल्याचे समजते. कृषि मंत्रालयावर दोन्ही जनता दलांनी दावा केला आहे. भाजपवर घटक पक्षांनी दबाव वाढवला असला तरी, विविध क्षेत्रांतील पायाभूत विकासांची मंत्रालये सोडण्याची भाजपची तयारी नाही. गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र संबंध ही चार अत्यंत संवेदनशील महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यावर भाजप ठाम असून लोकसभा सभापती पदाबाबतही तडजोड केली जाणार नसल्याचे समजते. तेलुगु देसमला लोकसभेचे उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते.

दरम्यान, जनता दलाने (सं) रेल्वे तर, तेलुगु देसमने माहिती-तंत्रज्ञान, रस्तेविकास या खात्यांची मागणी केली असली तरी या खात्यांची राज्यमंत्रिपदे त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे.

जनता दल आणि तेलुगु देसम या दोन्ही प्रमुख घटक पक्षांना अनुक्रमे किमान २ आणि ४ केंद्रीय मंत्रिपदे दिली जाऊ शकतील. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, जनता दल (ध), राष्ट्रीय लोकदल, लोकजनशक्ती पक्ष, अपना दल, हिंदुस्तान अवामी मोर्चा, जनसेना, रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांनाही स्थान दिले जाईल. यापैकी अनेक पक्षांनी किमान दोन मंत्रिपदाची मागणी केली असली तरी, मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल असे समजते.

कोणत्या घटकपक्षाचा होणार विचार?

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, पवार गटाचे प्रफुल पटेल यांना मंत्री केले जाऊ शकते. भाजपमधून नारायण राणे व उदयनराजे भोसले व रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

घटक पक्षांच्या खात्यांच्या मागण्या

● तेलगु देसम : लोकसभाध्यक्ष, रस्तेविकास, पंचायत राज, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान व शिक्षण

● संयुक्त जनता दल : कृषि, रेल्वे, पंचायत राज, ग्रामीण विकास

● जनता दल (धर्मनिरपेक्ष) : कृषि, पंचायत राज, नागरी पुरवठा, ग्रामीण विकास

● शिवसेना शिंदे : अवजड उद्याोग

महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, पवार गटाचे प्रफुल पटेल यांना मंत्री केले जाऊ शकते. भाजपमधून नारायण राणे, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले आणि रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

Modi 3.0 : Names and accounts of ministers still in the bouquet, but the media kite-flying continues!!

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात