बहुमत चाचणीनंतर महाआघाडीला मोठा धक्का
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून रोज काहीतरी नवीन घडत आहे. आता बहुमत चाचणीनंतर , मंगळवारी येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथील न्यायालयाने भाकपा आमदार मनोज मंझील यांना न्यायालयाने हत्येप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनंतर त्यांचे सदस्यत्व जाऊ शकते. 2015 मध्ये जेपी सिंग हत्याकांडात ते आरोपी होते.MLA Manoj Manjeel sentenced to life imprisonment in Bihar
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज मंझील हे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आगियान राखीव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मंगळवारी जिल्हा न्यायालयाने भाकपा आमदार मनोज मंझील आणि इतर 22 आरोपींना शिक्षा सुनावली. कोर्टात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बहुमत चाचणीनंतर हा महाआघाडीला मोठा धक्का आहे. आता या आमदाराचे सदस्यत्व रद्द झाल्याची अधिकृत घोषणा होणार आहे. त्यानंतर लवकरच आरक्षित विधानसभेतून मतदान घ्यावे लागणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खून प्रकरणात आमदार व इतरांना शिक्षा झाली आहे. ही घटना 2015 सालची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण अजीमाबाद पोलीस ठाण्याच्या बडगाव नारियाडीह गावातील आहे. येथे जयप्रकाश सिंह आपल्या मुलासोबत बाजारातून घरी परतत असताना वाटेत आमदार मनोज मंझील आणि इतर 22 आरोपींनी त्यांच्यावर लाठ्याकाठ्याने हल्ला केला. या हल्ल्यात जयप्रकाश सिंह ठार झाले. मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेहही गायब केल्याचा आरोप आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App