विशेष प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरातही ओडिशातील तेराव्या शतकातल्या कोणार्क सूर्यमंदिराप्रमाणे चमत्कार घडणार आहे. मात्र त्यासाठी वैज्ञानिकांची मदत घेतली जाणार आहे.रामलल्लाच्या मूर्तीवर गाभाऱ्यामध्ये सूर्यकिरण पडतील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने दिली आहे.Miracles like the Konark Sun Temple in the Ram Temple in Ayodhya
ओडिशातील तेराव्या शतकातल्या कोणार्क सूर्यमंदिरापासून ही प्रेरणा घेण्यात आली आहे. मंदिराच्या रचनेची निश्चिाती करण्यात येत असून त्यात दर रामनवमीला सूर्याचे किरण रामलल्लाच्या मूर्तीवर पडतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
त्यासाठी वैज्ञानिक, खगोलवैज्ञानिक, तंत्रज्ञ यांचा सल्ला घेतला जाणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कामेश्वार चौपाल यांनी दिली.। चौपाल यांनी सांगितले की, ओडिशातील कोणार्कचे सूर्यमंदिर याचे उत्तम उदाहरण असून त्या मंदिरात सूर्यकिरण पडतात.
राम मंदिरात तशी व्यवस्था करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून सूर्यकिरण मंदिराच्या गाभाऱ्यात पडणार आहेत. त्यांनी सांगितले की, यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिल्डींग कन्स्ट्रक्शन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयटी रुरकी यांचा सल्लागार गट तयार केला जात आहे, हा गट तांत्रिक सल्ला देईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App