G Kishan Reddy : ‘मोदी सरकारमुळेच राहुल लाल चौकात जेवू शकले’, जी किशन रेड्डींचा टोला!

कलम ३७० बाबत नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रस्तावावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही दिले आहे.


विशेष प्रतिनिधी

जम्मू : केंद्रीय मंत्री आणि जम्मू-काश्मीर निवडणुकीचे प्रभारी जी किशन रेड्डी ( G Kishan Reddy ) यांनी राहुल गांधींवर( Rahul Gandhi )  टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात राहुल गांधींचं जेवणं ही मोदी सरकारची उपलब्धी असल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी लाल चौकात जेवत आहेत, ही परिस्थिती सुधारणेचा परिणाम असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. तसेच, रेड्डी म्हणाले की, राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी कलम 370 सोबतच नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रस्तावावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी.



नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यात असे आश्वासन देण्यात आले आहे की जर ते सत्तेवर आले तर ते कलम 370 पुनर्संचयित करण्यासाठी काम करतील. कलम 370 बहाल करण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या वक्तव्यानुसार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरमधील जनतेचे हक्क पुन्हा हिरावून घ्यायचे आहेत का हे सांगावे, असे ते म्हणाले.

भाजपच्या निवडणुकीच्या तयारीला गती देण्यासाठी जम्मूमध्ये आलेले रेड्डी म्हणाले की, मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे. राहुल गांधी यांच्या काश्मीर दौऱ्यात याचा प्रत्यय आला आहे.

Minister G Kishan Reddy targeted Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात