आसाममधील शाळेच्या मदतीसाठी धावले दूधवाले, सहकारी संस्थांतील दोन हजार दूधवाले शाळेसाठी लीटरमागे १५ पैसे देणार

विशेष प्रतिनिधी

मोरीगाव (आसाम) : आसाममधील दूधवाल्यांनी सामाजिक बांधिलकीचे आगळे-वेगळे उदाहरण घालून दिले आहे., सहकारी संस्थेच्या सुमारे दोन हजार दूधवाल्यांनी अडचणीत सापडलेल्या शाळेला मदत करण्यासाठी दर लीटरमागे १५ पैसे शाळेला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.Milkmen run to help school in Assam, 2,000 milkmen from co-operative societies will pay 15 paise per liter for the school

मोरीगाव जिल्ह्यातील सीताखळा दूध सहकारी सोसायटी राज्यातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी दुग्ध सहकारी संस्था आहे. या संस्थेने दोन दिवसांपूर्वी सीताखळा उच्च माध्यमिक शाळेला इयत्ता अकरावीचे वर्ग चालविण्यासाठी 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.



 

आमच्या दुधवाल्यांचीच मुले या शाळेचे विद्यार्थी आहेत.प्राथमिक शाळेला शासनाचे अनुदान आहे. मात्र, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अद्यापही विनाअनुदानित आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे दूधवाल्यांनी आपल्या उत्पन्नातील काही भाग शाळेसाठी दान करण्याचे ठरविले असे सीताखळा दूध सहकारी संस्थेचे अध्यक्ष रंजीब सरमा यांनी पीटीआयला सांगितले.

सरमा म्हणाले, जोपर्यंत सरकारी अनुदान मिळत नाही तोपर्यंत दुधवाल्यांच्या पाठिंब्याने सीताखळा दूध सहकारी सोसायटीने शाळेच्या उच्च माध्यमिक विभागाला दरवर्षी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत मूलभूत शेतीविषयक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सरकारकडे आग्रह करत आहेत.

सरमा म्हणाले की, कोरोनाच्या काळात गवळी समाजाला प्रचंड त्रास सहन करावा लागला, परंतु आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे.शाळेचे मुख्याध्यापक उत्तम डेका यांनी मोरीगाव येथील गोभा आदिवासी पट्ट्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या प्रयत्नात सरकारला पुढे येऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Milkmen run to help school in Assam, 2,000 milkmen from co-operative societies will pay 15 paise per liter for the school

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात