विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अनेकदा एटीएममध्ये गेल्यावर रोकड शिल्लक नसल्यामुळे पैसे मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. यामुळे रिझर्व्ह बॅँकेने आता निर्णय घेतला असून एटीएममध्ये रोकड नसल्यास बॅँकेला दंड होणार आहे.Banks to be penalized for non-availability of cash in ATMs, RBI decides due to inconvenience to customers
1 ऑक्टोबर 2021 पासून एका महिन्यात एकूण १० तासांसाठी एटीएम रोख नसल्यास आरबीआय बँकांवर दंड आकारण्यास सुरुवात करेल. आरटीआयने एका परिपत्रकात म्हटले आहे की, एटीएमद्वारे जनतेला पुरेशी रोकड उपलब्ध आहे याची खात्री करणे बँकांचे कर्तव्य आहे. त्यामुळेच ही दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक जनतेला रोख पैसे नोटांच्या स्वरुपात उपलब्ध करून देते. बँका त्यांच्या शाखा आणि एटीएमच्या विस्तृत नेटवर्कद्वारे लोकांना रोख रक्कम मिळणे सुलभ होते. त्यामुळे एटीएमच्या डाऊनटाईमचा आढावा घेण्यात येणार आहे.
बँकांनी एटीएममध्ये रोख रकमेच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वेळेवर भरणा करण्यासाठी यंत्रणा तयार करावी. या नियमाचे पालन केले नाही तर आर्थिक दंड आकारला जाईल, असे रिझर्व्ह बॅँकेने म्हटले आहे. एका महिन्यात दहा तासांपेक्षा जास्त एटीएम कॅश-आउट असल्यास प्रत्येक एटीएमला १०,००० रुपयांचा दंड आकारला जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App