Target Killing In Kashmir : श्रीनगरमधील ईदगाह परिसरात दहशतवाद्यांनी आज एका महिलेसह दोन सरकारी शाळेच्या शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या तीन दिवसांत अशा प्रकारची ही पाचवी घटना आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. MHA Amit Shah High Level Meeting On Target Killing In Jammu Kashmir
वृत्तसंस्था
श्रीनगर : श्रीनगरमधील ईदगाह परिसरात दहशतवाद्यांनी आज एका महिलेसह दोन सरकारी शाळेच्या शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या तीन दिवसांत अशा प्रकारची ही पाचवी घटना आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल, आयबी प्रमुख अरविंद कुमार, डीजी सीआरपीएफ कुलदीप सिंग, डीजी बीएसएफ पंकज सिंह आणि गृह सचिव अजय भल्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत टार्गेट किलिंगवर सविस्तर चर्चा झाली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “श्रीनगर जिल्ह्यातील संगम ईदगाह भागात दहशतवाद्यांनी सकाळी 11.15च्या सुमारास दोन शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली.”
तत्पूर्वी, मंगळवारी काश्मिरी पंडित बिंद्रू यांची श्रीनगर येथील फार्मसीमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. बिंद्रू हे त्यांच्या समाजातील काही लोकांपैकी एक होते ज्यांनी 1990 मध्ये दहशतवादाच्या उद्रेकानंतर काश्मीर सोडले नाही.
बिंद्रू यांच्या हत्येच्या काही मिनिटांनंतर, दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील हवाल चौकाजवळ बिहारच्या भागलपूर येथील रहिवासी वीरेंद्र पासवान नावाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्याला गोळ्या घातल्या. यानंतर दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील नायदखई येथे मोहम्मद शफी लोन यांचीही गोळ्या घालून हत्या केली.
नुकत्याच घडलेल्या या घटनांबाबत जम्मू -काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, दहशतवादी अशा घटना येथे भय, जातीय द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी करत आहेत. स्थानिक काश्मिरी मुस्लिमांना बदनाम करण्याचा हा कट आहे. पाकिस्तानी एजन्सींच्या सूचनेनुसार हे केले जात आहे.
MHA Amit Shah High Level Meeting On Target Killing In Jammu Kashmir
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App