आज पहाटे ५ पासूनच सुरू मंदिर करण्यात आले होते .पाहाटे ऑनलाईन बुकींग केलेले भक्त मंदिरात दाखल झाले होते.An anonymous phone call caused a stir at the Ambabai temple in Kolhapur; Stopped darshan of devotees
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : घटस्थापनेच्या मुहूर्तावर साडेतीन शक्तिपीठांपैकी महत्वाच म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर.आज पहाटे ५ पासूनच सुरू मंदिर करण्यात आले होते .पाहाटे ऑनलाईन बुकींग केलेले भक्त मंदिरात दाखल झाले होते ,परंतू दुपारच्या सुमारास पोलिसांना एक निनावी फोन आल्याने सावधानता म्हणून अंबाबाई मंदिरातील दर्शन थांबविण्यात आले आहे.
तसेच पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून मोठी धावपळ उडाली आहे.घातपात करण्याचा निनावी फोन आल्याने पोलिसांनी तातडीने दर्शनाची रांग थांबविली. त्यानंतर तातडीने मंदिराला वेढा घालत श्वान आणि बॉम्बशोधक पथकांना मंदिर परिसरात दाखल झाले. याबाबतचा तपास सुरू आसून पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील मंदिरात दाखल झाले आहेत.बर्याच महिन्यांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या .तसेच घटस्थापनेदिवशीच दर्शन सुरु झाल्याने भाविकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते. परंतू, मंदिरात घातपात होण्याची धमकी मिळाल्याने आणि भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन होत नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App