ऋतिक रोशनचे आर्यन खानला तात्त्विक उपदेशाचे खुले पत्र; कंगना म्हणाली, सगळे “माफिया पप्पू” त्याच्या भोवती उभे राहिलेत!!


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबई – गोवा क्रूजवरील ड्रग्स रेव्ह पार्टीमध्ये सामील झालेल्या आर्यन खानला अटक झाल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकार त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. यामध्येच आता ऋतिक रोशनहीचा समावेश झाला आहे.Hrithik Roshan’s open letter of philosophical advice to Aryan Khan; Kangana said, all the “Mafia Pappu” stood around him

ऋतिक रोशनने आर्यन खान याच्या नावाने तात्विक उपदेश करणारे एक पत्र इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. “डियर आर्यन, तू या आगीत तप्त होऊन तावून-सुलाखून बाहेर ये. जीवन असेच असते, ते कधी आनंद देते तर कधी दुःख देते…!! आपण पुढे चालत राहायचे असते. चुकांमधून शिकायचे असते. चुका करणे म्हणजे गुन्हा नव्हे…!!, असा उपदेश ऋतिक रोशनने या खुल्या पत्रात आर्यन खाल्ला केला आहे.हे पत्र त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करतात अभिनेत्री कंगना राणावत हिने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सगळे “माफिया पप्पू” आता आर्यन खानच्या पाठीशी उभे राहायला पुढे आले आहेत, अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला आहे.

आर्यन खानने कोणते देशभक्तीचे कृत्य केलेले नाही. तो ङ्रग्ज रेव्ह पार्टीमध्ये सामील झालेला असताना सापडला आहे. त्याच्याविरोधात भारतीय कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. तो दोषी असेल तर त्याला शिक्षा होईलच, अशा शब्दात कंगना राणावत हिने आर्यन खान विषयी सहानुभूती दाखवणार्या बॉलिवूडच्या तारे-तारकांना खडसावले आहे.

आर्यन खान याला अटक झाल्यानंतर सलमान खान तसेच कविता कृष्णमूर्ती यांच्यासह अनेक बॉलिवूडचे कलाकार शाहरूख आणि गौरी खानच्या भेटीसाठी मन्नतवर पोहोचले होते. जणू काही आर्यन खानला पकडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कोणता गुन्हाच केला आहे, असा आव त्यांनी आणला होता. या पार्श्वभूमीवर कंगना राणावत हिने आर्यन खान याच्या पाठीशी उभे राहणार्‍या बॉलिवुडच्या कलाकारांना खडसावले आहे.

Hrithik Roshan’s open letter of philosophical advice to Aryan Khan; Kangana said, all the “Mafia Pappu” stood around him

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”