Mehboob Ali : देशात मुस्लिमांची लोकसंख्या वाढली, ती भाजपचे राज्य संपविणार; समाजवादी पार्टीचे आमदार महबूब अली यांची दमबाजी!!

Mehboob Ali

विशेष प्रतिनिधी

अमरोहा : संपूर्ण देशात मुस्लिमांची लोकसंख्या वाढली आहे ती एक दिवशी भाजपचे राज्य नक्की संपवेल, अशी दमबाजी उत्तर प्रदेश मधले समाजवादी पार्टीचे आमदार महबूब अली यांनी केली. Mehboob Ali MLA samajwadi party

ही दमबाजी करताना मेहबूब अली यांनी बिजनौर मधल्या संविधान बचाव सभेचा आधार घेतला. त्या सभेचे नाव संविधान बचाव सभा होते. परंतु, त्या सभेतली सगळी भाषणे भाजपची सत्ता संपवण्यावर भर देणारी होती, पण त्या पलीकडे जाऊन मुस्लिमांनी एकजूट करावी. मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याचा परिणामकारक उपयोग करावा, अशी दमबाजी करणारी होती.

या सभेत महबूब अली म्हणाले, भारतावर 800 वर्षे मुघलांनी राज्य केले, पण नंतर ते संपले. भाजप देखील असाच संपणार आहे. 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील भाजपची राजवट संपून जाईल कारण मुस्लिमांची लोकसंख्या वाढली आहे. मुस्लिम संविधानिक मार्गाने सत्ता ताब्यात घेतील.

मुस्लिमांची लोकसंख्या वाढली असे सांगून भाजपला सत्ता खेचून घेण्याची दमबाजी करणारे महबूब अली हे 2002 पासून समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना राज्यांमध्ये वस्त्रोद्योग आणि रेशीम उत्पादन मंत्री बनवले होते. 2017 मध्ये समाजवादी पार्टीची सत्ता गेल्यानंतर त्यांचे मंत्रिपद गेले. पण आता मुस्लिम लोकसंख्येच्या बळावर ते भाजपची राजवट संपविण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत.

Mehboob Ali MLA samajwadi party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात