विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य सेवा अपुरी पडत आहे. आरोग्यसेवेवरचा वाढणारा ताण लक्षात घेता तेलंगणचे मुख्यमंत्री के. सी. आर राव यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्णMedical students get job in telengana
केलेल्या सुमारे ५० हजार पात्र विद्यार्थ्याची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंगल आणि अदिलाबाद येथे सुपऱस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार असून तेथे ७२९ जणांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
येत्या दोन तीन महिन्यांसाठी डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा सहायक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञासह अन्य आरोग्य कर्मचारी पदावर तत्काळ भरती करण्यासंदर्भात वैद्यकीय आणि आरोग्य खात्याला निर्देश दिले आहेत.
अस्थायी स्वरूपात नेमण्यात येणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार वेतन देण्यात येईल.सध्याच्या कठीण काळात लोकांची सेवा करण्यासाठी राज्यातील तरुण डॉक्टरांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरावा असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App